कान्स (फ्रान्स)- बॉलिवूड सुपरस्टार दीपिका पदुकोण या वर्षी प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवाचा भाग होण्यासाठी ज्युरी सदस्यांपैकी एक म्हणून कान्समध्ये पोहोचली आहे. कान्स ज्युरी सदस्य म्हणून दीपिकाचा पहिलाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दीपिकाने सोमवारी कान्स 2022 मध्ये ज्युरी सदस्य म्हणून तिची पहिली अधिकृत उपस्थिती दर्शवली. हॉटेल मार्टिनेझ, कान्स येथे ज्युरी सदस्यांसाठी आयोजित डिनरमध्ये अभिनेत्री उपस्थित होती. दीपिकाचे ज्युरी सदस्यांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
याआधी सोमवारी, दीपिकाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर कान्समध्ये तिच्या आगमनानंतर तिच्या चाहत्यांशी झालेल्या संवादाची एक व्हिडिओ क्लिप शेअर केली. व्हिडिओ क्लिपमध्ये, दीपिकाला डेनिम क्रॉप्ड जॅकेटमध्ये दिसत असून ती चाहत्यांशी अतिशय अनौपचारिक पध्दतीने वागताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तिच्या कान्सच्या प्रवासाची झलक स्टाईलमध्ये दाखवण्यात आली आहे. दीपिकाने शेअर केले की तिच्या 11 तासांच्या फ्लाइट प्रवासात ती बहुतेक झोपली होती.