मुंबई - 'नो मोअर बेट्स' हा चायनीज चित्रपट या आठवड्यात ग्लोबल मार्केटमध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. हॉलिवूडच्या 'बार्बी' चित्रपटाच्या कमाईलाही या चायनीज चित्रपटाने मागे टाकले आहे. गेल्या शनिवारी आणि रविवारी जागतिक फिल्म मार्केटमध्ये 'नो मोअर बेट्स' चित्रपटाने सर्वांनाच मागे टाकत बॉक्स ऑफिसवर निर्विवादपणे राज्य केले. शुक्रवार ते रविवार या कालावधीत या चित्रपटाने चीनमध्ये ८८ दशलक्ष डॉलर्सची कमाई केली.
'नो मोअर बेट्स'च्या या जबरदस्त कामगिरीने स्टार-स्टडेड हॉलिवूड चित्रपट 'बार्बी'च्या लोकप्रियतेला धक्का दिला. 'बार्बी' या चित्रपटात मार्गोट रॉबी आयकॉनिक डॉल आणि केनच्या भूमिकेत रायन गॉस्लिंग आहे. २१ जुलै रोजी रिलीज झालेल्या, ग्रेटा गेर्विगच्या 'बार्बी' चित्रपटाने जगभर जबरदस्त कमाई केली परंतु, 'नो मोअर बेट्स'ने सेट केलेल्या प्रभावी आकड्यांशी ती जुळू शकली नाही.
एका आंतरराष्ट्रीय वेबलॉइडने उघड केले की, 'बार्बी' चित्रपटाने उत्तर अमेरिकेत रिलीजच्या चौथ्या आठवड्याच्या अखेरीस ३३.७ दशलक्ष कमाईचा आकडा गाठला. याशिवाय इंटरनॅशनला मार्केटमधून चित्रपटाने ४५.१ दशलक्ष डॉलर्स कमावले. 'बार्बी'ने आठवड्या अखेरीस ७८.८ दशलक्ष डॉलर्सची कमाई केली होती.
असे असले तरी, 'नो मोअर बेट्स'ला मिळालेले यश आणखी उत्तुंग होते, कारण त्याच्या अचूक आकड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या आर्टिसन गेटवेच्या चीनच्या बॉक्स ऑफिस डेटाने चित्रपटाच्या अफाट यशाचे संकेत दिले. 'नो मोअर बेट्स' चित्रपटाने यापूर्वीच २४७.५ दशलक्ष डॉलर्सची कमाई एकट्या चीनमधून झाली आहे.
शेन एओ दिग्दर्शित आणि निंग हाओ निर्मित, 'नो मोअर बेट्स' ले झांग यांनी चित्रित केलेल्या संगणक प्रोग्रामर आणि जीना जिनने जिवंत केलेल्या मॉडेलभोवती फिरणारी एक आकर्षक कथा आहे. परदेशात बक्कळ पैशाच्या नोकरीच्या शोधात असलेली दोन पात्र एका क्रूर टोळीच्या जाळ्यात अडकतात आणि ऑनलाइन फसवणुकीच्या जाळ्यात नकळत सहभागी होतात.