महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'अवतार : द वे ऑफ वॉटर'चा ट्रेलर रिलीज - second part of Avatar

अवतार २ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. डायनॅमिक रेंज, उच्च फ्रेम रेट, उत्तम रिझोल्यूशन आणि व्हिज्युअल इफेक्ट्स चित्रपटाची मजा द्विगुणित करणार आहेत. हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस (16 डिसेंबर) प्रदर्शित होणार आहे.

'अवतार : द वे ऑफ वॉटर'चा ट्रेलर रिलीज
'अवतार : द वे ऑफ वॉटर'चा ट्रेलर रिलीज

By

Published : May 10, 2022, 11:43 AM IST

मुंबई- हॉलिवूडमधील सर्वात महागडे बजेट असलेला हृदयस्पर्शी मेगा ब्लॉकबस्टर चित्रपट 'अवतार'च्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. गेल्या दहा वर्षांपासून प्रेक्षक या चित्रपटाच्या सिक्वेलची वाट पाहत होते. आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. कारण 'अवतार : द वे ऑफ वॉटर'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची पहिली झलक २७ एप्रिल रोजी लास वेगास येथील सिनेमाकॉनमध्ये पाहायला मिळाली होती.

कसा आहे ट्रेलर? -जर तुम्ही चित्रपटाचा पहिला भाग पाहिला नसेल आणि तुम्ही हॉलिवूड चित्रपटांचे चाहते असाल तर तुम्ही तो जरूर पाहावा. कारण चित्रपटाचा दुसरा भाग पाहणे रंजक ठरणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागानुसार, ही कथा Pandora ग्रहाभोवती फिरते. Pandora हा अल्फा सेंच्युरीच्या ग्रहाचा चंद्रासारखा उपग्रह आहे, जिथे वातावरण पृथ्वी ग्रहापेक्षा अधिक आकर्षक आणि अतुलनीय आहे. पृथ्वीवर जीवनासारखे जीवन आहे आणि लोकांमध्ये भिन्न प्रकारचे विचार आणि शक्ती आहे.

यावेळी चित्रपटात मुख्य कलाकार एकटे नसून त्यांची मुलंही दिसणार आहेत. पेंडोराचे सुंदर आणि चमकदार निळे पाणी ट्रेलरमध्ये दिसते. ट्रेलरमध्ये नावीचा एक डायलॉग देखील आहे ज्यामध्ये तो म्हणतो, 'जिथे जाऊ, हा परिवारच आमचा किल्ला आहे.'

या चित्रपटाचे दिग्दर्शन जेम्स कॅमेरून यांनी केले आहे. यावेळी पुन्हा चित्रपट थ्रीडीमध्येही दिसणार आहे. डायनॅमिक रेंज, उच्च फ्रेम रेट, उत्तम रिझोल्यूशन आणि व्हिज्युअल इफेक्ट्स चित्रपटाची मजा द्विगुणित करणार आहेत.

यावेळी चित्रपटात मागील कलाकारांसोबत केट विन्सलेट, मिशेल येहो, डेव्हिड थेवलीस आणि विन डिझेल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. इंग्रजीशिवाय हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेतही प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस (16 डिसेंबर) प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -शाहरुख खानच्या 'मन्नत' बंगल्याशेजारील जीवेश बिल्डिंगला भीषण आग

ABOUT THE AUTHOR

...view details