वॉशिंग्टन ( यूएस ) - अभिनेत्री अंबर हर्ड हिने हॉलिवूडला राम राम ठोकल्याच्या बातम्या झपाट्याने पसरल्या होत्या आणि यावर ती काहीच भाष्य करत नसल्याने लोकांना ते खरेही वाटू लागले होते. मात्र स्वतः अंबरने याबाबत मौन सोडले असून आपल्या हातात चित्रपट असून आयुष्यात पुढे चालत राहण्यावर विश्वास असल्याचे तिने म्हटलंय.
अंबर हर्डने केला हॉलिवूड सोडले नसल्याचा खुलासा- अंबर हर्ड हॉलिवूड सोडणार असल्याच्या बातम्यांचे खंडन केले आहे. पेज सिक्सने बातमी दिलीय की अंबर हर्डने एका लेटेस्ट टीक टॉक व्हिडिओमध्ये सांगितलंय की ती सध्या स्पेनमध्ये आहे व तिच्या हातामध्ये चित्रपट आहे. 'मला स्पेन खूप आवडते,' असे तिने स्पॅनिश भाषेतील स्थानिक पत्रकाराला सांगितले. तिला स्पेनमध्ये जास्त काळ राहण्याची योजना आहे का असे विचारले असता, 'मला तशी इच्छा आहे. मला इथे राहायला खूप आवडते.' यावर पत्रकाराने नंतर तिच्याकडे काही चित्रपट प्रकल्प नियोजित आहेत का असे विचारले असता ती 'होय' म्हणाली. पुढे जात आहे. हेच जीवन आहे', असेही ती म्हणाली.
अंबर हर्डचा मुलीसह स्पेनमध्ये मुक्काम- अलीकडबातम्यांनुसार अभिनेत्री अंबर हर्ड आपल्या मुलीसह स्पेनमध्ये मुक्काम करत आहे. ती स्थलांतरित झाल्यामुळे तिने हॉलिवूड सोडल्याच्या बातम्या सर्वत्र झळकल्या होत्या. गेल्या वर्षी 1 जून रोजी तिचा माजी पती जॉनी डेपने तिच्याविरुद्धचा मानहानीचा खटला जिंकल्यानंतर फक्त तीन महिन्यांनी सप्टेंबर 2022 मध्ये हर्ड युरोपला रवाना झाली. ती तिची मुलगी ओनाघसह पाल्मा डी मॅलोर्काच्या सहलीवर असताना दिसली.
जॉनी डेपने जिंकला होता अंबर विरोधातला खटला - तेव्हापासून, अंबर हर्ड आणि तिची मुलगी स्पेनच्या आसपास अनेकवेळा स्पॉट झाल्या होत्या. त्यानंतर पेज सिक्स नुसार तिने मनोरंजन विश्व सोडल्याचे वृत्त आले. अभिनेता जॉनी डेपने 2018 मध्ये अंबर विरुद्ध खटला दाखल केला होता, जेव्हा अभिनेत्री अंबरने वॉशिंग्टन पोस्टसाठी एक ऑप-एड लिहिली, ज्यामध्ये तिने जॉनी डेपरवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता.कोर्टाच्या सुनावणीत अंबरने जॉनीविरोधात अनेक गंभीर आणि धक्कादायक खुलासे केले. बळजबरीने शरीरसंबंध आणि शारीरिक छळ केल्याचा आरोपही केला होता. अंबर हर्डने शेवटी पोस्टमध्ये तिचे नाव न घेता सुमारे 50 दशलक्ष डॉलर नुकसानीची मागणी केली होती.ज्युरीने अंबर हर्डसह जॉनी डेपलाही अनेक प्रकरणांमध्ये दोषी ठरवले आहे. अशा परिस्थितीत हर्डला 2 दशलक्ष डॉलर्सची नुकसानभरपाईही मिळेल, असा निकाल न्यायालयाने दिला होता.