मुंबई- अभिनेता अली फजलने बुधवारी त्याच्या आगामी हॉलिवूड अॅक्शन थ्रिलर चित्रपट कंदहारच्या फर्स्ट लूक पोस्टरचे लॉन्चिंग केले. इन्स्टाग्रामवर अलीने चित्रपटातील स्वतःचे पहिले-पहिले पोस्टर चाहत्यांना भेट दिले. फर्स्ट लूक पोस्टरमध्ये अली वाळवंटाच्या मध्यभागी एका डर्ट बाईकसमोर अगदी रांगड्या लूकमध्ये दिसत आहे. अली हॉलिवूडमधील सर्वात मोठा अॅक्शन स्टार जेरार्ड बटलरसोबत दिसणार आहे. हा चित्रपट 26 मे रोजी अमेरिकेत रिलीज होणार आहे. सौदी अरेबियाच्या अल उला भागात या चित्रपटाचे मोठ्या प्रमाणावर चित्रीकरण करण्यात आले आहे.
अली फझलची हॉलिवूड एन्ट्री- अली फझल हा पहिला भारतीय अभिनेता आहे ज्याने 2017 च्या व्हिक्टोरिया आणि अब्दुल या दिग्गज डेम जुडी डेंचसह हॉलिवूड चित्रपटात मुख्य भूमिका केली होती. अभिनेता अली आता दिग्दर्शक रिक रोमन वॉच्या अॅक्शन चित्रपटातील एक लीड म्हणून काम करत आहे. रिक रोमन वॉ यांना एंजेल हॅज फॉलन आणि ग्रीनलँड या चित्रपटामुळे आंतरराष्ट्रीय ख्याती मिळाली आहे. रिक रोमन वॉ दिग्दर्शित, कंदहार चित्रपटात लोकप्रिय स्कॉटिश अभिनेता गेरार्ड बटलर, नवीद नेगाहबान, ट्रॅव्हिस फिमेल आणि एलनाझ नोरोझी प्रमुख भूमिकेत आहेत.