महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'फायटर'मधील अक्षय ओबेरॉयचा फर्स्ट लूक रिलीज, स्क्वाड्रन लीडर बशीर खानची साकारतोय भूमिका

Fighter Akshay Oberoi Look : अभिनेता हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणच्या 'फायटर' चित्रपटामधील अक्षय ओबेरॉयचा फर्स्ट लूक समोर आला आहे. या चित्रपटामध्ये अक्षय स्क्वाड्रन लीडर बशीर खानच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे.

Fighter Akshay Oberoi Look
फायटर अक्षय ओबेरॉय फर्स्ट लूक

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 13, 2023, 2:51 PM IST

मुंबई - Fighter Akshay Oberoi Look :अभिनेता हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्टारर चित्रपट 'फायटर' हा सध्या सतत चर्चेत आहे. 'फायटर' हा देशातील पहिला आणि सर्वात मोठा एरियल अ‍ॅक्शन चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचा टीझर चाहत्यांना खूप आवडला होता. 'फायटर' चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. दरम्यान या चित्रपटामधील अभिनेता अक्षय ओबेरॉयचा फर्स्ट लूक समोर आला आहे. या चित्रपटामध्ये अक्षय हा स्क्वाड्रन लीडर बशीर खानच्या व्यक्तिरेखेमध्ये दिसेल. 'फायटर' चित्रपटामध्ये या नव्या चेहऱ्यानं प्रवेश केला आहे.

अक्षय ओबेरॉयचं 'फायटर' चित्रपटामधील फर्स्ट लूक : अभिनेता करण सिंग ग्रोव्हरचा फर्स्ट लूक 12 डिसेंबर रोजी रिलीज करण्यात आला होता. करणचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला होता. अक्षय ओबेरॉय, अनिल कपूर, हृतिक रोशन, दीपिका पदुकोण हे कलाकार टीम एअर ड्रॅगनचाही भाग असणार आहेत. 'फायटर'मधून एकामागून एक कलाकारांचे नाव समोर येत आहेत. हा चित्रपट 25 जानेवारी 2024 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. 'वॉर' आणि 'पठाण' या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतल्यानंतर दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद हे 'फायटर' रिलीजसाठी सज्ज झाले आहेत. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना खूप अ‍ॅक्शन सीन पाहायला मिळणार आहेत.

कोण आहे अक्षय ओबेरॉय? : अक्षय ओबेरॉय हा भारतीय-अमेरिकन अभिनेता आहे. अक्षयनं 2002 मध्ये अमेरिकन 'टी' या चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून अभिनयाच्या जगात प्रवेश केला. यानंतर 2010 मध्ये तो राजश्री प्रोडक्शनच्या 'इसी लाइफ में' या चित्रपटात दिसला होता. यानंतर अक्षयनं 'पिझ्झा' (2014), 'पिकू' (2015), 'फितूर' ,'लाल रंग' (2016), 'गुडगाव' (2017), 'कालाकांडी' (2018), 'बंबरिया', 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा', 'जंगली' (2019) यांसह अनेक चित्रपटामध्ये काम केलं आहे. अक्षयच्या आगामी चित्रपटांमध्ये 'दिल है ग्रे', 'सुप्रीमसी', 'एक कोरी कथा' आणि 'तू चाहिये' यांचा समावेश आहे.

हेही वाचा :

  1. 'अ‍ॅनिमल' चित्रपटातील बॉबी देओलच्या भूमिकेवर वडील धर्मेंद्रनं दिली 'ही' प्रतिक्रिया
  2. एमी-विजेता अभिनेता आंद्रे ब्राउगर यांचे वयाच्या 61 व्या वर्षी निधन
  3. ऑस्कर विजेती गुनीत मोंगाने पती सनी कपूरसोबत साजरा केला लग्नाचा पहिला वाढदिवस

ABOUT THE AUTHOR

...view details