लॉस एंजेलिस : अभिनेत्री व्हायोला डेव्हिसने रविवारी तिचे आत्मचरित्र 'फाइंडिंग मी' च्या रेकॉर्डिंगसाठी ग्रॅमी जिंकला. या विजयासह ती प्रतिष्ठीत 'इजीओटी' (EGOT) च्या श्रेणीत दाखल झाली आहे. इजीओटी म्हणजे एमी (E), ग्रॅमी (G), ऑस्कर (O) आणि टोनी (T) हे सर्व प्रतिष्ठेचे पुरस्कार जिंकणारी व्यक्ती होय! डेव्हिस हे टायटल मिळवणारी तिसरी कृष्णवर्णीय महिला आणि इतिहासातील 18वी व्यक्ती आहे.
'इजीओटी' चे स्वप्न पूर्ण : स्टेजवर विजयाचा क्षण साजरा करताना 57 वर्षीय डेव्हिस आनंदाने म्हणाली, मला ईजीओटी मिळाला! तिने सर्वोत्कृष्ट ऑडिओ बुक, कथन आणि कथा रेकॉर्डिंगसाठी ग्रॅमी जिंकला. यासह डेव्हिसने 2015 मध्ये टीव्ही मालिका 'हाऊ टू गेट अवे विथ मर्डर' साठी एमी जिंकला आहे. तसेच 2016 च्या 'फेन्सेस' मधील तिच्या भूमिकेसाठी तिला 2017 मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार आणि 'फेन्सेस' आणि 'किंग हेडली II' साठी तिला दोन टोनी पुरस्कार मिळाले आहेत.
सहा वर्षांच्या व्हायोला साठी पुस्तक लिहिले : तिने रविवारी तिचे ग्रॅमी स्वीकारताना म्हटले, 'मी हे पुस्तक सहा वर्षांच्या व्हायोलाचा सन्मान करण्यासाठी, तिचे आयुष्य, तिचा आनंद साजरा करण्यासाठी आणि तिच्या सर्व गोष्टींचा सन्मान करण्यासाठी लिहिले आहे.' यंदाच्या ग्रॅमीसाठी ग्रॅलिन-मॅन्युएल मिरांडा, क्वेस्टलोव्ह, मेल ब्रूक्स आणि जेमी फॉक्स या मोठ्या नावांसह तिच्या श्रेणीत डेव्हिस ही एकमेव महिला नामांकित होती. इतर इजीओटी विजेत्यांमध्ये जेनिफर हडसन, रीटा मोरेनो, ऑड्रे हेपबर्न आणि हूपी गोल्डबर्ग यांचा समावेश आहे.
ग्रॅमी अवॉर्ड्स : ग्रॅमी अवॉर्ड्स हा संगीत जगतातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. पहिला ग्रॅमी पुरस्कार 1959 मध्ये देण्यात आला होता. यापूर्वी हा सन्मान फक्त संगीतातील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जात होता. नंतर हा पुरस्कार तीन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये देण्यात येऊ लागला. आता अकादमी पुरस्कार (चित्रपट), एमी अकादमी पुरस्कार (टेलिव्हिजन) आणि टोनी अकादमी पुरस्कार (थिएटर) असे तीन ग्रॅमी पुरस्कार दिले जातात. ग्रॅमी अवॉर्ड दरवर्षी दिले जातात. जगभरातील कलाकारांना त्यांच्या कामगिरीच्या आधारे हा पुरस्कार दिला जातो. भारतीय अमेरिकन गायिका फाल्गुनी शाह हिने 2022 चा ग्रॅमी पुरस्कार जिंकला होता.
हेही वाचा :Chitrashi Rawat Wedding : अभिनेत्री कोमल चौटाला उर्फ चित्राशी रावतच्या लग्नात चक दे इंडिया गँग दिसली एकत्र, पाहा फोटो...