हैदराबादलोकप्रिय टीव्ही मालिका बालिका वधू आणि रिअॅलिटी शो 'बिग बॉस 13 मधून विजेतेपद मिळवल्यानंतर प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेल्या अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरली आहे. सिद्धार्थ शुक्ला यांचे गुरूवारी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 40 व्या वर्षी निधन झाले. यशस्वी अभिनेता असूनही त्याला वाईट गोष्टींचे व्यसन लागले होते. चला जाणून घेऊया सिद्धार्थ शुक्लाच्या आयुष्याबद्दल 10 महत्वाच्या गोष्टी.
- सिद्धार्थचा जन्म 12 डिसेंबर 1985 रोजी मुंबईत झाला. तो कुटुंबातील सर्वात मोठा आणि आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. सिद्धार्थला दोन लहान बहिणी आहेत. मॉडेलिंग करत असताना सिद्धार्थच्या वडिलांचे निधन झाले. अशा परिस्थितीत आईनेच तिघांना वाढवले होते.
- सिद्धार्थने आपले प्राथमिक शिक्षण मुंबईतील सेंट झेवियर्स स्कूलमधून केले आणि नंतर इंटिरियर डिझायनिंगचा कोर्स केला. त्याने इंटिरियर डिझायनर म्हणून पहिले काम केले. दोन वर्षे काम केल्यानंतर त्याने मॉडेलिंगमध्ये प्रवेश केला.
- सिद्धार्थला सुरुवातीपासूनच खेळाची आवड होती. तो फुटबॉल आणि टेनिस खेळत असे. आणि शाळेच्या दिवसात उत्कृष्ट खेळाडू होता.
- मीडिया रिपोर्टनुसार, सिद्धार्थला अभिनेता बनण्याची इच्छा नव्हती. सिद्धार्थचा फोकस त्याचा व्यवसाय आणि नोकरी करण्यावर होता.
- सिद्धार्थ शुक्लाला 2005 मध्ये ग्लेड्रॅग्स मॅनहंटचा वर्ल्ड बेस्ट मॉडेल पुरस्कार मिळाला. आणि 2008 मध्ये त्याला तुर्कीतील सर्वात मोठ्या मॉडेलिंग शोमध्ये संधी मिळाली. सिद्धार्थने तो शो जिंकून देशाचे नाव रोशन केले होते.
- सिद्धार्थ अत्यंत तापट स्वभावाचा अभिनेता होता. तसेच त्याच्या रागाचे कारण त्याचे नशा असल्याचे सांगितले गेले. सिद्धार्थला आपले व्यसन सोडण्यासाठी पुनर्वसन केंद्रात दोन वर्षे काढावी लागली.
- रागामुळे तो प्रसिद्ध टीव्ही सिरियल 'दिल से दिल तक'च्या टीमसोबत लढतानाही दिसला. सिद्धार्थवर शोची अभिनेत्री रश्मी देसाईला शिवीगाळ केल्याचा आरोपही होता. त्यानंतर सिद्धार्थला शोमधून काढण्यात आले.
- आरती सिंह, शेफाली जरीवाला, रश्मी देसाई आणि अभिनेत्री स्मिता बन्सल यांच्याशी सिध्दार्थचे अफेअर होत असल्याचे बोलले जाते.
- बिग बॉस 13 ट्रॉफी जिंकल्यानंतर सिद्धार्थचे नाव शोची सह स्पर्धक आणि पंजाबी गायिका शहनाज गिलशी जोडले गेले. ही जोडी अनेक म्युझिक व्हिडिओ अल्बममध्ये एकत्र दिसली होती.
- सिद्धार्थचे अफेयर अनेक अभिनेत्रीसोंबत होते. मात्र, त्याने कधीच लग्न केले नाही.