महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / elections

मोदींचा नाही तर 'हे' चित्रपट पाहणार नागरिक; ममता बॅनर्जींचा मोदींवर घणाघात - Mamata Rally

लोकसभा निवडणुकांना एक आठवड्यापेक्षाही कमी वेळ उरलेला आहे. त्या पार्श्वभूमिवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर, दिग्गज नेते एकामागून एक मोठ-मोठे वक्तव्य करत आहेत. ममता बॅनर्जीही यात मागे नाहीत. सध्या वादात असलेला पी. एम. नरेंद्र मोदी या चित्रपटावरही त्यांनी आक्षेप नोंदवला आहे.

ममता बॅनर्जी सभेमध्ये बोलताना

By

Published : Apr 4, 2019, 4:43 PM IST

कोलकाता - जनतेने पंतप्रधान मोदी यांच्यावर येणारा चित्रपट का पाहावा? असा सवाल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीर सभेत उचलला आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर कूचबिहार येथे आयोजित एका सभेमध्ये त्या बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकारला फैलावर घेतले.


लोकसभा निवडणुकांना एक आठवड्यापेक्षाही कमी वेळ उरलेला आहे. त्या पार्श्वभूमिवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर, दिग्गज नेते एकामागून एक मोठ-मोठे वक्तव्य करत आहेत. ममता बॅनर्जीही यात मागे नाहीत. सध्या वादात असलेला पी. एम. नरेंद्र मोदी या चित्रपटावरही त्यांनी आक्षेप नोंदवला आहे. नरेंद्र मोदी यांनी देशासाठी काय योगदान दिले ज्यामुळे त्यांचा चित्रपट जनतेने पाहावा? असा टोला त्यांनी भाजपवर मारला.


जनतेला मोदींचा चित्रपट नाही तर डॉ. आंबेडकर आणि गांधीजींचा चित्रपट पाहायचा आहे. मोदीच कशाला? असा सवाल त्यांनी यावेळी जनसभेत उचलला आहे. पश्चिम बंगालमध्ये ४२ लोकसभेच्या जागा आहेत. तेथे निवडणुकांच्या सातही टप्प्यामध्ये मतदान होणार आहे.


कूचबिहारमध्ये पहिल्या टप्प्यात निवडणुका होणार आहेत. ही जागा अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. या मतदार संघातून परेश चंद्रा अधिकारी तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. तर, भाजपने नितीश प्रामाणिक यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेस या जागेवरून स्वतंत्र निवडणूक लढवत आहे. तसेच काँग्रेसकडून प्रिया रॉय चौधरी निवडणूक लढवत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details