मुंबई- लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. राज्यातील या अखेरच्या टप्प्यात १७ मतदारसंघात मतदान आहे. तर यात मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांचा समावेश असून उत्तर मुंबई मतदारसंघात मतदानाला सुरूवात झाली आहे.
उत्तर मुंबई मतदारसंघात मतदानाला सुरूवात, उर्मिला मातोंडकर आणि गोपाळ शेट्टींमध्ये लढत - BJP
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी आणि काँग्रेसच्या उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्यात प्रमुख लढत असणार आहे
![उत्तर मुंबई मतदारसंघात मतदानाला सुरूवात, उर्मिला मातोंडकर आणि गोपाळ शेट्टींमध्ये लढत](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3135176-thumbnail-3x2-vote.jpg)
उर्मिला मातोंडकर आणि गोपाळ शेट्टींमध्ये लढत
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी आणि काँग्रेसच्या उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्यात प्रमुख लढत असणार आहे. या निवडणुकीत उत्तर मुंबईच्या जनतेचा कौल सेलिब्रिटी असलेल्या उर्मिला मातोंडकरला मिळतो की गार्डन सम्राट म्हणून ओळख असलेल्या गोपाळ शेट्टींना हे पाहणे महत्तवाचे ठरणार आहे.
उर्मिला मातोंडकर आणि गोपाळ शेट्टींमध्ये लढत