पुणे- शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये सकाळपासून संथगतीने मतदान सुरू आहे. उन्हाच्या कडाक्याचाही फटका मतदानावर बसत आहे. त्यामुळे सकाळपासूनच मतदानाची टक्केवारी कमी प्रमाणात येत आहे. आंबेगाव तालुक्यात आज तृतीयपंथीयांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच, प्रत्येक नागरिकाने मतदान करावे, असे आव्हानही त्यांनी केले आहे.
शिरुर लोकसभा मतदारसंघात तृतीयपंथीयांनी बजावला मतदानाचा हक्क - election
तृतीयपंथी नेहमीच प्रत्येक घटकांपासून वंचित राहत असतात. मात्र, आज शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये संदीप गिरे आणि अंजू पाटिल या तृतीयपंथीयांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
शिरुर लोकसभा मतरदारसंघात तृतीयपंथीयांनी बजावला मतदानाचा हक्क
तृतीयपंथी नेहमीच प्रत्येक घटकांपासून वंचित राहत असतात. मात्र, आज शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये संदीप गिरे आणि अंजू पाटिल या तृतीयपंथीयांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
'मतदान करणं हा अधिकार तर आहेच, त्यासोबतच ते राष्ट्रीय कर्तव्यही आहे. सर्वांनी हे कर्तव्य बजावावे, असे ते यावेळी म्हणाले.