परभणी - राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक दिग्गजांनी पक्षाला रामराम करत भाजप प्रवेश केला. मात्र, त्यातून खचून न जाता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नव्या जोमाने पक्ष बांधणीच्या कामाला लागले आहेत. भूतकाळातील करिश्मा पून्हा करून दाखवू यावर पवारांचा ठाम विश्वास आहे. त्याच विश्वासाच्या जोरावर त्यांनी आता पक्ष सोडून गेलेल्या आमदार आणि नेत्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.
पवारांचे भाकीत ; " ते " आमदार पुन्हा विधानसभेत दिसणार नाहीत राज्याच्या राजकारणात कसलेले राजकारणी म्हणून शरद पवारांची ओळख आहे. त्यांनी केलेल्या राजकीय खेळ्यांमुळे त्यांच्या विरोधात गेलेल्या अनेक नेत्यांना घरी बसावे लागले होते हा इतिहास आहे. १९७८ साली पवारांनी काँग्रेस (एस) पक्ष स्थापन करून निवडणूक लढवली होती. त्यात त्यांनी ६० आमदार निवडून आणले होते. त्यापैकी तब्बल ५२ आमदार त्यांना १९८० साली सोडून गेले. त्यावेळी त्यांनी सोडून गेलेले आमदार पुन्हा कधीच विधानसभेत दिसणार नाहीत अशी भिष्म प्रतिज्ञाच केली होती. विशेष म्हणजे झाले ही तसेच त्यापैकी एकही आमदार पुन्हा कधी निवडून आला नाही किंवा विधानसभेत दिसला नाही. पवारांचा तो मास्टर स्ट्रोक होता. हाच करिष्मा त्यांनी राज्याच्या राजकारणात कायम ठेवला. त्यामुळे राजकारणा कुठे काही झाले तरी ते पवारांनीच केले अशी चर्चा सर्वत्र असते. हे पवारांचे मोठे यश आहे. १९८० प्रमाणेच पवारांपुढे आताची स्थिती निर्माण झाली आहे. त्यावेळी पवारांबरोबर त्यांचे वय होते. आता वय नसले तरी तोच उत्साह आणि धमक मात्र पवारांकडे आहे. त्यांचा आत्मविश्वास आणि इच्छाशक्तीही दांडगी आहे. त्यावरच ते आता पक्ष सोडून गेलेल्यांना कायमचे घरात बसवण्यासाठी स्वत: बाहेर पडले आहे. प्रत्येक सभांमध्ये ही ते हेच बोलून दाखवत आहे. पवारांचे भाकीत ; " ते " आमदार पुन्हा विधानसभेत दिसणार नाहीत परभणीतल्या सभेत तर त्यांनी पक्ष सोडून गेलेल्यांना थेट लक्ष केले. ते ऐवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी १९८० सालची आठवणही पक्ष सोडणाऱ्यांना करून दिली. त्यामुळे पवार १९८० ची पुनर्रावृत्ती करणार का हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे. पण पवारांच्या या वक्तव्यामुळे त्या पक्ष सोडणाऱ्या नेत्यांच्या मनात धडकी भरली असणार हे मात्र नक्की.