नाशिक- जिल्ह्यातील नाशिक, दिंडोरी आणि धुळे या मतदार संघासाठी ४७२० मतदान केंद्रे सज्ज झाले आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी २७ हजार १९५ कर्मचारी नेमण्यात आले असून सर्वच मतदान केद्रांवर निवडणुकीचे साहित्य पोहोचवण्यासाठी लगबग सुरू आहे.
नाशिक, धुळे आणि दिंडोरी मतदारसंघासाठी ४७२० केंद्र सज्ज, उद्या होणार मतदान - fourth phase election
नाशिक आणि दिंडोरी मतदार संघासाठी उद्या मतदान होणार असून त्या दृष्टीने निवडणूक शाखेने तयारी पूर्ण केली आहे. या मतदारसंघात १७ लाख २८ हजार मतदार आहेत
नाशिक आणि दिंडोरी मतदार संघासाठी उद्या मतदान होणार असून त्या दृष्टीने निवडणूक शाखेने तयारी पूर्ण केली आहे. नाशिक लोकसभेतील सर्व पोलींग पार्टी या साहित्यासह दुपारी ३ वाजेपूर्वीच केंद्रावर पोहण्याचे नियोजन केले आहे. तर दिंडोरीत हे साहित्य पोहचवण्यासाठी अधिक वेळ लागण्याची शक्यता असून ५ वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व पोलींग पार्टी केंद्रावर पोहोचणार आहे.
नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी मतदानाच्या साहित्याचे वाटप सकाळपासून सुरू झाले असून या मतदारसंघात १७ लाख २८ हजार मतदार आहेत. सध्या या मतदारसंघातील जवळपास ४ हजार मतदान केंद्रांवर निवडणूकीचे साहित्य पोहचवण्यासाठी लगबग सुरू आहे. मतदान प्रक्रियेसाठी २० हजार कर्मचारी नेमण्यात आले आहेत. तर केंद्रावर मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट नेण्यास बंदी असल्याची माहिती निवडणूक अधिकारी अरुण अनंदकर यांनी दिली.