महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / elections

लोकसभा निवडणूक : तिसऱ्या टप्प्यातील प्रचार'तोफा' आज थंडावणार - लोकसभा निवडणूक

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान २३ एप्रिल रोजी होणार आहे. या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज सायंकाळी ६ वाजता प्रचाराची सांगता होईल. जाहीर प्रचाराची सांगता झाल्यानंतर छुप्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.

मुंबई

By

Published : Apr 21, 2019, 9:14 AM IST

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान २३ एप्रिल रोजी होणार आहे. या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज सायंकाळी ६ वाजता प्रचाराची सांगता होईल. जाहीर प्रचाराची सांगता झाल्यानंतर छुप्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.

तिसऱ्या टप्प्यात राज्यातील १४ मतदारसंघात मतदान होणार आहे. यामध्ये जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या मतदारसंघांचा समावेश आहे. यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे.

या टप्प्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि भाजप-सेना युती यांच्यात प्रामुख्याने लढती होणार आहेत. पुणे, बारामती, माढा, हातकणंगलेसह सर्वच मतदारसंघातील लढतीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details