पुणे - शरद नावावर आता विश्वास नाही, त्यामुळे सोनवणेंचे नाव घ्यायला विसरलो. असे म्हणत भाजप नेते गिरीश बापट यांनी शरद पवारांवर मिश्किल शब्दात टीका केली. अजित पवार हे स्वार्थ आणि पार्थच्या मागे लागले आहेत, असेही बापट म्हणाले. ते शिरुरचे युतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या उमेदवारी अर्ज भरतानाच्या रॅलीत बोलत होते.
शरद नावावर आता विश्वास राहिला नाही, अजित पवार स्वार्थ आणि पार्थच्या मागे - गिरीश बापट - bapat
आढळराव यांचा अर्ज भरण्याआधी नरपतगिर चौकात सभा घेण्यात आली. त्यावेळी बापटांनी भाषण केले. ते म्हणाले, की अजित पवार आपल्या मुलासाठी फिरत आहेत. ही घराणेशाही मोडीत मोडून काढायची आहे. शिरुरमध्ये दिलीप वळसे पाटील यांना उमेदवारी घ्यायची म्हटले की घाम फुटतो.
आढळराव यांचा अर्ज भरण्याआधी नरपतगिर चौकात सभा घेण्यात आली. त्यावेळी बापटांनी भाषण केले. ते म्हणाले, की अजित पवार आपल्या मुलासाठी फिरत आहेत. ही घराणेशाही मोडीत मोडून काढायची आहे. शिरुरमध्ये दिलीप वळसे पाटील यांना उमेदवारी घ्यायची म्हटले की घाम फुटतो. त्यामुळे येथे आयात उमेदवार आणावा लागला. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील चारही जागांवर युतीचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास बापट यांनी व्यक्त केला.
दरम्यान, भाषण सुरू करताना बापट शिवसेनेत नव्यानेच आलेल्या शरद सोनवणे यांचे नाव घेतले. तेव्हा त्यांनी शरद या नावावरुन मिश्किल टिप्पणी केली. ते म्हणाले, की मला शरद नावाची भीती वाटते. सोनवणे यांचे नाव शरद असल्याने ते घ्यायला जरा घाबरलो. कारण शरद नावावर आता विश्वास राहिला नाही.