महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / elections

फॉर्म क्रमांक 7 भरून मतदान करता येणार ही माहिती चुकीची; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

मतदान ओळखपत्र नसले तरी किंवा मतदान यादीत नाव नसले तरी फॉर्म क्र.७ भरून मतदान करता येते ही माहिती चुकीची आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

निवडणूक आयोग

By

Published : Apr 21, 2019, 11:24 PM IST

मुंबई - मतदान ओळखपत्र नसले तरी किंवा मतदान यादीत नाव नसले तरी फॉर्म क्र.७ भरून मतदान करता येते, अशी माहिती सध्या व्हॉटसअॅपसह सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही माहिती खोटी असून कोणीही यावर विश्वास ठेऊ नये, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

व्हॉटसअॅप आणि फेसबुक या समाजमाध्यमांवर फॉर्म ७ भरून मतदान करता येते, अशा आशयाची पोस्ट व्हायरल होत आहे. यासंदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने खुलासा केला आहे. फॉर्म क्रमांक ७ हा इतर व्यक्तीचे नाव समाविष्ट करण्याबद्दल आक्षेप घेण्यासाठी, स्वतःचे नाव वगळण्यासाठी, इतर कोणत्याही व्यक्तीचे नाव मृत्यू/स्थलांतर झाल्यामुळे वगळण्यासाठी अर्ज करण्यासंदर्भातील आहे. या फॉर्मद्वारे मतदान करता येणार नाही. त्यामुळे समाज माध्यमांवर फिरणाऱ्या यासंबंधीच्या पोस्टवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये.

मतदानासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. यादीत नाव असेल आणि मतदार ओळख पत्र नसले तरी निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या इतर ११ ओळखपत्रांच्याद्वारे मतदानाचा हक्क बजावता येतो, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details