सोलापूर - शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. सोलापूर शहरातील विजापूर रोडवरील नेहरूनगर येथील ईव्हीएम मशीन तब्बल एक तास बंद पडले होते. त्यामुळे मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. तसेच शहरातील चाँद तारा मशीद, जुना वालचंद कॉलेज या ठिकाणच्याही मशीन काही वेळ बंद होत्या.
सोलापूर शहरासह जिल्ह्यात EVM बिघाडाच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी, मतदार ताटकळले - evm machines off
शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. सोलापूर शहरातील विजापूर रोडवरील नेहरूनगर येथील ईव्हीएम मशीन तब्बल एक तास बंद पडले होते. त्यामुळे मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. तसेच शहरातील चाँद तारा मशीद, जुना वालचंद कॉलेज या ठिकाणच्याही मशीन काही वेळ बंद होत्या.
सोलापूर
सोलापूर शहरासह ग्रामीण भागातही मशीन बंद असल्याच्या तक्रारी येत आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिपरगा येथील हर्षवर्धन शाळेतील मतदान केंद्रावरही मशीन बंद असल्याची तक्रार आली आहे. त्यासोबतच दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे गावातही मशीन बंद असल्याची तक्रार आहे. पंढरपूर शहरातही काही ठिकाणी मशीन बंद पडल्याची तक्रार करण्यात आली आहे.