महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / elections

अमिताभ बच्चन, सोनाली बेंद्रे यांनी बजावला मतदानाचा हक्क - mumbai

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीदेखील त्यांच्या कुटुंबासह विले पार्ले येथील 'जमनाबाई नरसी स्कुल' या मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले आहे. त्यांच्यासोबत जया बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय यांनीही मतदान केले.

अमिताभ बच्चन, सोनाली बेंद्रे यांनी बजावला मतदानाचा हक्क

By

Published : Apr 29, 2019, 5:22 PM IST

मुंबई -आज महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. मुंबईतील विले पार्ले येथे कलाविश्वातील अनेक कलाकारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा टक्का वाढण्यासाठी हे कलाकार मतदारांना मतदान करण्याचे आवाहनही करत आहेत. सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत अनेक कलाकारांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले आहे.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीदेखील त्यांच्या कुटुंबासह विले पार्ले येथील 'जमनाबाई नरसी स्कुल' या मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले आहे. त्यांच्यासोबत जया बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय यांनीही मतदान केले.

अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिनेही पती गोल्डी बेहलसोबत मतदानाचे कर्तव्य बजावले.

अभिनेता वत्सल सेठ यानेही मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.

या सर्वांचा आढावा घेतलाय आमचे 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनीधी अल्पेश करकरे यांनी...

अमिताभ बच्चन, सोनाली बेंद्रे यांनी बजावला मतदानाचा हक्क

ABOUT THE AUTHOR

...view details