महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / elections

संसदेत कन्हैयासारख्या लोकांची गरज - प्रकाश राज - kanahiya kumar

ही निवडणूक कोणाचा विरोध करण्यासाठी नाही. कोणाला शिव्या देण्याची गरज नाही. ही जनतेची निवडणूक आहे. कन्हैया सामान्य जनतेच्या समस्या आणि आवाज संसदेत पोहचवेल.

अभिनेते प्रकाश राज

By

Published : Apr 22, 2019, 9:48 AM IST

पाटणा- कन्हैया कुमार सीपीआयकडून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. यानिमित्ताने बेगूसराय येथे कन्हैया कुमारचा प्रचार करण्यासाठी बॉलीवूड अभिनेते प्रकाश राज पोहचले आहेत. यावेळी प्रकाश राज म्हणाले, मी सुद्धा भारताचा रहिवासी आहे. कन्हैया कुमार देशाचा बुलंद आवाज आहे. संसदेत कन्हैयासारख्या लोकांची गरज आहे.

प्रकाश राज यांची प्रतिक्रिया

प्रकाश राज म्हणाले, कन्हैया या देशाचा मुलगा आहे. यासाठी मी कन्हैयाचा प्रचार करण्यासाठी आलो आहे. ही निवडणूक कोणाचा विरोध करण्यासाठी नाही. ही जनतेची निवडणूक आहे. कोणाला शिव्या देण्याची गरज नाही. कन्हैया सामान्य जनतेच्या समस्या आणि आवाज संसदेत पोहचवेल.

निवडणुकीत कोणता नेता किंवा पक्ष जिंकत नाही. जर योग्य उमेदवाराची निवड झाली तर जनतेचा विजय होतो. यासाठी निवडणूक ही जनतेच्या विजयाचा किंवा पराभवाचा प्रश्न आहे. बेगूसरायमधील लोकांमध्ये कमालीची उत्साह आहे. येथील लोकांनी मला खूप प्रेम दिले आहे. यामुळे मी आनंदी आहे, असेही ते प्रचाराच्यावेळी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details