ईव्हीएममध्ये गडबड होती, मात्र शिक्षा होण्याच्या भीतीने तक्रार केली नाही - माजी पोलीस महासंचालक
आसामचे माजी पोलीस महासंचालक हरिकृष्ण देखा यांनी ईव्हीएम मशीनमध्ये गडबड असल्याचा आरोप केला आहे. ज्याला मतदान केले त्याच्या नावाऐवजी दुसऱ्याचेच नाव व्हीव्हीपॅट मशीनमध्ये दिसून आले असल्याचे ते म्हणाले. मात्र, तक्रार केल्यावर शिक्षा होण्याच्या भीतीने प्राथमिक तक्रार नोंदवली नाही, त्यामुळे माझा दावा खरा ठरु शकला नाही, असेही ते म्हणाले.
गुवाहाटी - आसामचे माजी पोलीस महासंचालक हरिकृष्ण देखा यांनी ईव्हीएम मशीनमध्ये गडबड असल्याचा आरोप केला आहे. ज्याला मतदान केले त्याच्या नावाऐवजी दुसऱ्याचेच नाव व्हीव्हीपॅट मशीनमध्ये दिसून आले असल्याचे ते म्हणाले. मात्र, तक्रार केल्यावर शिक्षा होण्याच्या भीतीने प्राथमिक तक्रार नोंदवली नाही, त्यामुळे माझा दावा खरा ठरु शकला नाही, असेही ते म्हणाले.
देखा म्हणाले, लचितनगरच्या एल.पी शाळा येथील मतदान केंद्रावर माझे मतदान होते. तेथे मतदान करणारा मी पहिला मतदार होतो. मतदान निर्धारीत वेळेपेक्षा जास्त उशिराने सुरू झाले, ते वेळाने का झाले हे मला माहीत नाही. मी मतदान केले मात्र, ज्याला मतदान केले त्याच्याऐवजी दुसऱ्याच उमेदवाराचे नाव व्हीव्हीपॅट मशीनमध्ये दिसले.