नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून दिल्लीत ७ पैकी ६ जागांवरील उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्याही नावाची घोषणा करण्यात आली आहे. दीक्षित ईशान्य दिल्लीमधून निवडणूक रिंगणात असणार आहेत. तर माजी केंद्रीय मंत्री अजय माकन नवी दिल्लीतून निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केल्याने आप आणि काँग्रेस आघाडीच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.
दिल्लीत आप-काँग्रेसची आघाडी नाहीच, काँग्रेसकडून उमेदवारांची घोषणा; माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित मैदानात - Parliamentary constituencies
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून दिल्लीत ७ पैकी ६ जागांवरील उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्याही नावाची घोषणा करण्यात आली आहे. दीक्षित ईशान्य दिल्लीमधून निवडणूक रिगंणात असणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि आपच्या आघाडीसंदर्भात चर्चा सुरू होती. आघाडीसाठी आपकडून पुढाकार घेतला जात होता. हरियाणा, चंदिगडमध्ये काँग्रेसने आपशी आघाडी करण्यास कालच नकार दिला होता. तर आज त्यांनी दिल्लीतील उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामुळे येथेही आघाडी होणार नसल्याचे स्पष्ट झाले.
चांदणी चौकमधून जे.पी.अग्रवाल, ईशान्य दिल्लीतून शीला दीक्षित, पूर्व दिल्लीतून अरविंद सिंग लवली, नवी दिल्लीतून अजय माकन, वायव्य दिल्लीतून (एससी) राजेश लिलोतीया तर पश्चिम दिल्लीतून महाबल मिश्रा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.