मुंबई: सध्या मुंबईसह महाराष्ट्रात मुलं चोरणारी टोळी (child stealer) सक्रिय झाल्याची अफवा वेगाने पसरत आहे. अफवांमुळे अनेक निरपराध लोकांना मारहाणीच्या घटना घडत आहेत. अशातचं, मुंबईमधुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलं चोरणारी महिला समजून पत्रकार महिलेला जमावाने रेल्वे स्थानकावर घेरल्याचा (woman journalist surrounded by mob) प्रकार कांजुरमार्ग रेल्वे स्थानकावर घडला आहे. या प्रकरणी पुनम पोळ (poonam pol) महिलेने मुंबई रेल्वे (Mumbai Railways) लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालीद (Railway Commissioner of Police Kaisa khali) यांच्याकडे ऑनलाइन तक्रार (Complain online) देखील केली आहे.
घडलेला प्रकार असा की पूनम विजय पोळ या महिला पत्रकार राहणार सेंट्रल रेल्वे कॉलनी, माटुंगा. त्या 22 सप्टेंबरला कांजूरमार्ग स्थानकावरून रेल्वेची ८.२८ ची गाडी पकडत असताना तेथील काही लोकांनी त्यांना आवाज दिला. पाठीवर जड बॅग आणि हातात अडीच वर्षांची मुलगी सृजन हर्षद साळुंके ही होती. हातातून काहीतरी गहाळ झाले असल्याची शंका आल्याने त्यांनी सदर उपस्थित व्यक्तींना प्रतिसाद दिला. यावेळी तेथील व्यक्तींना काय झाले ? असा प्रश्न केला. यावर त्यांनी पूनम यांस अर्वाच्य भाषा वापरत... मुलगी तुझी नसून चोरली असल्याचा आरोप केला.
यावेळी पूनम यांनी माहेरून परतत असल्याचे सांगितले. तसेच आजीचा मुलीला खूप लळा असल्याने मुलगी रडत असल्याचे सांगितले. हे सांगूनही त्या व्यक्तींच्या शंकेचे निरसन झाले नाही. यावेळी पूनम यांनी मोबाईलमध्ये मुलीचे असलेले फोटो सदर व्यक्तींना दाखवले. परंतु, एकट्या मुलीचा फोटो दाखवत असल्याचा आरोप करून त्यांनी जमाव गोळा करायला सुरुवात केली. या दरम्यान पूनम यांनी तिचे जन्मापासूनचे आत्तापर्यन्त असलेले काही फोटो जमलेल्या जमावाला दाखविण्याचा प्रयत्न केला. परंतु जमावाला भडकविण्याचा प्रयत्न काही मोजक्या लोकांनी सुरूच ठेवला.