मेरठ (उत्तरप्रदेश): जिल्ह्यात बलात्कार करण्यासाठी आलेल्या बलात्कार्यासमोर हिंमत दाखवून महिलेने स्वतःला वाचवले. स्वसंरक्षणार्थ महिलेने दाताने त्या नराधमाचे ओठ तोडले. ओठ तुटल्यामुळे आरोपीच्या तोंडातून रक्त वाहू लागले. तो वेदनेने रडू लागला. आवाज ऐकून घटनास्थळी गर्दी जमली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तरुणाला ताब्यात घेतले. महिलेने स्वसंरक्षणार्थ दाखवलेल्या या शौर्याचे कौतुक होत आहे.
शेतात काम करत असतानाच आरोपीकडून बलात्काराचा प्रयत्न : दौराळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, ती शनिवारी दुपारी शेतात काम करत असताना अचानक मागून कोणीतरी येऊन तिला पकडले. तिला कोणी पकडले हे समजू शकले नाही, म्हणूनच मागून पकडलेल्या व्यक्तीने महिलेला शेतात खाली पाडले. महिलेचे कपडे फाडण्यास सुरुवात केली.
स्वसंरक्षणार्थ तरुणाच्या ओठांना घेतला चावा: महिलेचा आरोप आहे की, ती तरुणापासून स्वत:ला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होती, त्यानंतर तरुणाने जबरदस्तीने महिलेचे चुंबन घेण्यास सुरुवात केली. स्वत:ला वाचवण्यासाठी महिलेने लगेचच दाताने तरुणाचे ओठ चावले. महिलेने तरुणाचे ओठ अशा प्रकारे चावले की, त्याच्या ओठाचा तुकडाच झाला. ओठ वेगळे केले असता तरुणाच्या तोंडातून रक्त वाहू लागले. त्याला वेदना होऊ लागल्या, तेव्हाच महिलेने मोठ्याने आरडाओरडा सुरु केला.
लोकांनी तरुणाला पकडले: महिलेचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोकही शेताकडे धावले. महिलेने संपूर्ण घटना सांगितली. लोकांनी मिळून आरोपीला पकडले. चौकशीनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि आरोपीचे कापलेले ओठ एका पाकिटात बंद करून ते घेऊन गेले. या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी तरुणाविरुद्ध तक्रार देताना कायदेशीर कारवाईची मागणी महिलेने केली आहे. पोलिसांनी जखमी तरुणावर सीएचसी दौराळा येथे उपचार केले. स्टेशन प्रभारी संजय कुमार शर्मा यांनी सांगितले की, महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध बलात्काराचा प्रयत्न आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.
पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात:दौराला पोलिस स्टेशनचे प्रभारी संजय कुमार शर्मा यांनी सांगितले की, विवाहित महिला एकटी सापडल्यानंतर, लवाद शहरातील रहिवासी मोहित सैनी याने एका महिलेला जवळच्या गावात एकटी दिसल्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिलेला काहीही समजले नाही म्हणून महिलेने आरोपीचे ओठ दाताने कापून वेगळे केले. ते म्हणाले की, पोलिसांना स्थानिक लोकांनी माहिती दिली होती. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला पकडून ताब्यात घेतले. जमिनीवर पडलेला त्याच्या ओठाचा तुकडाही पोलिसांनी एका पाकिटात घेतला आहे.
हेही वाचा: Boyfriend Killed Girlfriend: गर्लफ्रेंडला वैतागून बॉयफ्रेंडने केली हत्या, तुकडे-तुकडे करून दिले फेकून