सांगली :मिरज शहरातील मालगाव रोड इंदिरा नगर फाटा (Malgaon Road Indira Nagar Fata) येथे दोन मोटरसायकलचा समोरासमोर भीषण अपघात झाला आहे. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली असून या अपघातात मेडिकल व्यावसायिक निशिकांत तमान्ना घटनट्टी वय (38), राहणार जिलेबी चौक मिरज,हे जागीच ठार झाले. तर नितीन औरसंगे,वय (26), राहणार गणेश कॉलनी,मिरज.हे तरूण जखमी झाला होता परंतु उपचारा दरम्यान तरूणाचा मृत्यू झाला आहे.
Sangli Accident : सांगलीत मोटरसायकलची समोरासमोर धडक, दोन युवक ठार तर दोन जखमी - मिरज घटना
दोन मोटर सायकलची समोरासमोर भीषण धडक (Motorcycle Accident) होऊन दोन जण ठार झाल्याची घटना मिरजेत (Miraj incident) घडली आहे.यामध्ये एक मेडिकल व्यवसायिक आणि सेल्समनचा मृत्यू झाला आहे.तर दोन जण गंभीर जखमी आहेत.अपघात इतका भीषण होता की,या ठिकाणी दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे.
बुधवारी रात्री औषध विक्रेते निशिकांत तमान्ना घटनट्टी, हे आपले मेडिकल बंद करून दुचाकी वरून घरी निघाले होते,तर सेल्समन नितीन औरसंगे ,हा तरुण त्याचे मित्र मुजमिल मुलाणी,एहमद सुभेदार , दोघे राहणार मालगाव,अशी तिघे एकच दुचाकी वरून मालगावकडे जात होते.यावेळी इंदिरानगर फाटा जवळ या दोन दुचाकींचा समोरासमोर आल्याने अपघात झाला.या अपघातात निशिकांत घटनट्टी,नितीन औरसंगे हे दोघे जण मयत झाले असून मुजमिल मुलाणी आणि एहमद सुभेदार हे दोघे जखमी झाले आहेत.अपघात एवढा भीषण होता,की याचा मोठा आवाज झाला आणि परिसरातील नागरिकांनी अपघात ठिकाणी धाव घेतली. तर या अपघातात दोन्ही दुचाकी वाहनाचा चक्काचूर झाला होता. घटनास्थळी मिरज शहर पोलिसानी धाव घेतली व मिरज शहर पोलीस (Miraj City Police) अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा :पूर्णियामध्ये 6 वर्षीय मुलाची गळा चिरुन हत्या; हत्येनंतर आरोपींनी केले 'हे' कृत्य