महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / crime

घाटकोपरच्या रमाबाई नगरमध्ये 20 वर्षीय तरूणाची जुन्या वादातून 7 जणांकडून हत्या - विशाल कारंडे हत्या न्यूज

मुंबईच्या घाटकोपर येथील रमाबाई नगर तरुण मित्र मंडळ परिसरातील विशाल कारंडे या तरूणाची हत्या करण्यात आली आहे. 7 जणांनी मिळून विशालची हत्या केल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी आरोपींनी ताब्यात घेतले आहे. जुन्या वादातून ही हत्या केल्याचे समोर आले आहे.

mumbai
मुंबई

By

Published : May 2, 2021, 9:49 PM IST

Updated : Oct 10, 2022, 1:09 PM IST

मुबंईघाटकोपर येथील रमाबाई नगर तरुण मित्र मंडळ या परिसरात राहात असलेल्या विशाल कारंडे या तरूणाची हत्या करण्यात आली आहे. विशाल २० वर्षांचा होता. जुन्या भांडणाच्या रागातून त्याची 7 जणांनी मिळून हत्या केल्याचे बोलले जात आहे.

काल 1 मे रात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्याच परिसरात राहणाऱ्या तरुणांनी विशालला घरातून बाहेर बोलावून घेतले. तरुण मित्र मंडळाच्या चौकात नेऊन त्याला मारहाण केली. लाथा बुक्क्यांनी पेव्हर ब्लॉक लादीने व धारदार शास्त्राने पाठीवर वार केले. यात विशालचा मृत्यू झाला. विशालसोबतच्या जुन्या भांडणाच्या रागातून त्याची हत्या केल्याचे बोलले जात आहे.

त्यामुळे आता रमाबाई नगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आता हल्ला करणाऱ्या 7 आरोपींना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, विशाल कारंडेच्या अंत्यविधीसाठी नातेवाईक शेकडोंच्या संख्येने रस्त्यावर उतरल्याचे दिसले.

Last Updated : Oct 10, 2022, 1:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details