महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / crime

Thane news : ठाणे महानगर पालिका आयुक्तांची धडक कारवाई, शिपाई कर्मचाऱ्याचे तत्काळ निलंबन, वाचा काय आहे प्रकरण.. - accepting bribe

ठाणे महानगर पालिकेच्या माजिवाडा-मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत काम करणाऱ्या शिपायाला आयुक्तांनी तात्काळ निलंबन केले आहे. या शिपायाने मुलीच्या जन्म दाखल्याच्या प्रति देण्यासाठी पाचशे रुपयांची लाच मागितली होती, हा प्रकार ठाणे महानगर पालिका आयुक्त अभिजित बागर ( Thane Municipal Commissioner Abhijit Bangar ) यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ या घटनेची गंभीर दखल घेत, लाचखोर शिपायाला निलंबित केले आहे.

Thane news
ठाणे महानगर पालिका आयुक्तांची धडक कारवाई

By

Published : Oct 28, 2022, 9:59 PM IST

ठाणे : ठाणे महानगर पालिका आयुक्त अभिजित बागर ( Thane Municipal Commissioner Abhijit Bangar )यांनी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पहिले शिस्तीचे धडे देण्यास सुरुवात केली असून प्रामाणिक काम करण्याचा सल्ला दिला आहे. माजिवाडा-मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत काम करणाऱ्या शिपायाला आयुक्तांनी तात्काळ निलंबन केले आहे. या शिपायाने मुलीच्या जन्म दाखल्याच्या प्रति देण्यासाठी पाचशे रुपयांची लाच मागितली होती, हा प्रकार पालिका आयुक्तांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ या घटनेची गंभीर दखल घेत, लाचखोर शिपायाला निलंबित केले आहे.

ठाणे महानगर पालिका आयुक्तांची धडक कारवाई

काय आहे प्रकरण - ठाणे महापालिकेच्या माजिवाडा-मानपाडा प्रभाग समितीअंतर्गत येणाऱ्या कावेसर येथील उपकार्यालयामधील एका शिपायाने मुलीचा जन्म दाखल्याचे ५०० रुपये मागितले. मुलगी झाली म्हणून मला पैसे द्या,अशी मागणी त्याने केली होती, ही मागणी शिपायाला महागात पडली असून तक्रारदार महिलेने समाजमाध्यम मध्ये केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन महापालिका आयुक्त अभिजात बांगर यांनी शिपायाला निलंबित केले. तसेच कार्यालयीन अधीक्षक उपकार्यालयीन अधिक्षक आणि लिपीक अशा तीन अधिकाऱ्यांना याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे

अशी झाली कारवाई - ठाण्यातील घोडबंदर भागात ही तक्रारदार महिला वास्तव्य करीत असून तिचे पती मुलीचा जन्म दाखला घेण्यासाठी कावेसर येथील उपकार्यालयामध्ये गेले होते. तिच्या पतीने जन्म दाखल्याच्या दहा प्रति देण्याची मागणी करून त्याप्रमाणे २०० रुपये शुल्काचा भारणा केला. या कार्यालयामध्ये जन्म दाखला देण्याच्या कामाची जबाबदारी एका शिपायावर सोपविण्यात आली असून त्याने जन्म दाखल्याच्या प्रती देण्यासाठी त्यांच्याकडे एक हजार रुपयांची मागणी केली. त्यावर त्यांनी पैसे कशासाठी द्यायचे अशी विचारणा करताच, मुलगी झाल्याच्या खुशीमध्ये पैसे देण्यास सांगितले. अखेर त्याने त्यांच्याकडून पाचशे रुपये घेतले. या छळाबाबत पतीने माहिती दिल्यानंतर त्या महिलेने ठाणे महापालिकेच्या ट्विटर हँडल या समाजमाध्यांवर याबाबत संदेश प्रसारित करून संताप व्यक्त केला. त्याची महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी गंभीर दखल घेऊन उपायुक्तांना याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी समाजमाध्यमांवर संदेश पाठवून त्या महिलेची संपर्क साधला आणि तिच्या घरी जाऊन संपुर्ण प्रकरणाची माहिती घेतली. त्यात जन्म दाखला देण्यासाठी मुलगी झाल्याच्या खुशीमध्ये एका शिपायाने पैशांची मागणी करून त्यांच्याकडून पाचशे रुपये घेतल्याची बाब समोर आली.


पुढेही कारवाई होणार -नागरिकांना सेवा पुरविणे हे महापालिकेचे कर्तव्य असून त्याचबरोबर सेवा घेतल्यानंतर नागरिकांना त्याचा सुखद अनुभव यायला हवा. त्यामुळे या पुढे सेवा देताना असे गैरप्रकार समोर आले तर, संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त बांगर यांनी सर्वच अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिल्याचेही सुत्रांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details