महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / crime

Terrible Accident in Pune : पुण्यातील लवळे फाट्यावर भीषण अपघात; अपघातात 10 महिन्यांच्या चिमुकल्यासह आईचा जागीच मृत्यू - 10 month old Child dies

पुण्यातील पिरंगुटनजीक ( Pirangutan in Pune ) लवळे फाटा ( Accident Near Lovele Fata ) येथे फरशी घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या धडकेत 10 महिन्यांच्या चिमुकल्यासह ( 10 month old Child dies ) आईचा जागीच ( unfortunate death of mother ) मृत्यू झाला. तर महिलेचे पती जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात भरती केले आहे. तसेच आणखी दुचाकी चालकाचा या अपघातात मृत्यू झाला आहे.

Lovele Fata Near Terrible Accident
पुण्यातील पिरंगुटनजीक अपघात

By

Published : Jul 4, 2022, 10:32 AM IST

पुणे : पुण्यातील पिरंगुटनजीक ( Pirangutan in Pune ) असलेल्या लवळे फाटा ( Accident Near Lovele Fata ) येथे काल संध्याकाळी साडेपाच वाजल्याच्या सुमारास एक ट्रक व दुचाकी याचा अपघात झाला असून,या अपघातामध्ये तीन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तर, एक व्यक्ती जखमी झालेली आहे. या भीषण अपघातात 10 महिन्यांच्या ( 10 month old Child dies ) चिमुकल्यासह आईचाही दुर्दैवी मृत्यू ( unfortunate death of mother ) झाला. आणखी एका दुचाकी चालकाला धडक बसल्याने त्याचाही यामध्ये मृत्यू झाला असून, एक जखमीला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.


अपघातातील मृतांची नावे : या अपघातात रेश्मा (वय २५ वर्षे) या महिलेचा व त्यांचा 10 महिन्यांचा मुलगा रिवांश पवन पटेल या बालकाचा मृत्यू झाला आहे. महिलेचे पती पवन रमेश पटेल ( वय ३२ वर्षे) हे जखमी झाले आहेत, तर नांदे गावचे रहिवासी तानाजी विठ्ठल ढमाले (वय वर्ष अंदाजे ३० ते ३५ ) यांचादेखील या अपघातादरम्यान मृत्यू झाला आहे.

ब्रेक फेल झाल्याने ट्रकने दिली धडक : लवळे फाट्यावर फरशीने भरलेला ट्रक पौडच्या दिशेने सायंकाळच्या सुमारास जात होता. त्याच्या पुढे दोन दुचाकी आणि एक चारचाकी अशी तीन वाहने प्रवाशांसह जात होती. यावेळी ट्रकचे ब्रेक फेल झाले. ट्रकचा वेग जास्त असल्याने यावेळी चालकाला काहीही करता आले नाही. हा वेगवान आणि ब्रेक फेल झालेला ट्रक समोरील वाहनांना जोरदार धडकला. त्यावेळी पुढील बाजूस असलेल्या दुचाकीवर बाळासह चाललेल्या दाम्पत्याला जोरदार ठोकरल्याने बाळ आणि आईचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात घडलेल्या ठिकाणी तत्काळ दखल घेत पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली. अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती.

हेही वाचा :Three killed in Accident Kolhapur : पुणे बंगलोर महामार्गावर भीषण अपघात; हायवेवर बंद कंटेनरमुळे तिघांच्या मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details