महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / crime

अहमदनगर : श्रीरामपूरमध्ये बनावट दारू निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर छापा; 6 लाख 50 हजाराचा मुद्देमाल जप्त - श्रीरामपूर दारू कारवाई

बनावट मद्य निर्मिती करणार्‍या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अहमदनगर विभागाच्या पथकाने छापा टाकला आहे. यात साडे सहा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून याप्रकरणी दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाई
कारवाई

By

Published : Jun 23, 2021, 5:07 PM IST

अहमदनगर - श्रीरामपूर शहरातील संजयनगरमध्ये बनावट मद्य निर्मिती करणार्‍या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अहमदनगर विभागाच्या पथकाने छापा टाकला आहे. यात साडे सहा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून याप्रकरणी दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा छापा टाकून बनावट दारु बनविणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. श्रीरामपूर येथील संजयनगर ईदगाह मैदान याठिकाणी मोठ्या प्रमाणात बनावट देशी-विदेशी दारू तयार केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक अंमलबजावणी व दक्षता महाराष्ट्र राज्य श्रीमती उषा वर्मा, विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, गणेश पाटील, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक एस बी शेंडे, एस. एम. सराफ, उपधीक्षक अ विभाग ऐ बी बनकर, निरीक्षक ब विभाग एस के कोल्हे, निरीक्षक कोपरगाव बी. बी. हुलगे, निरीक्षक श्रीरामपूर ए. व्ही. पाटील, निरीक्षक पी. व्ही. अहीरराव, एम. डी. कोडे, व्ही. एम. बारवकर, एम. एस. धोका, एस. बी. भगत, जगताप के. यु. छत्रे कुमारी घोडे, नम्रता वाघ यांनी आपल्या सहकार्या सोबत ईदगाह मैदान संजयनगर येथे छापा टाकला असता त्याठिकाणी बनावट देशी व विदेशी दारु तयार केली जात असल्याचे आढळून आले.

श्रीरामपूर दारू कारवाई
यांच्या झाली कारवाई

बनावट दारू तयार करण्याकरीता लागणारे स्पिरीट 200 लिटर, 30 लिटर विदेशी मद्य, 180 मिली क्षमतेच्या 440 बनावट ब्रँण्डच्या बाटल्या, बनावट देशी मद्याच्या 180 मिलीच्या 384 बाटल्या, तसेच देशी भिंगरी व संत्रा लेबलच्या बाटल्या बनावट आढळून आले. तसेच विदेशी दारूची नामांकिता कंपनी इम्पेरियल ब्लू व मेक्डाल नं. 1 विस्की राँयल स्टग कंपनीचे व भिंगरी संत्रा दारूच्या बाटल्या, कृत्रीम स्वाद पदार्थ इसेन्स व फ्लेवर बँरल ड्रम, एमएच 06 बीजी 0852 क्रमांकाची पिकअप वाहन, असा 6 लाख 50 हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. मोहन यशवंत काळे (रा. दत्तनगर), राकेशकुमार केवलप्रसाद दहीया उर्फ मुन्ना (रा. ईटामा कोठार तालुका अमरपाटण जिल्हा सतना मध्य प्रदेश), चंद्रकांत शाम पवार यांच्या विरुध्द दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पवार हा पसार झालेला आहे. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे, की अशाप्रकारे अवैध बनावट देशी विदेशी दारू निर्मिती खरेदी विक्री वाहतुक करत असेल, तर अशी माहीती राज्य उत्पादन शुल्क विभागाला द्यावे, आपले नाव गुप्त ठेवले जाईल, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा -परभणीत लुटमारीच्या तीन घटना उघडकीस; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

ABOUT THE AUTHOR

...view details