महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / crime

Boyfriend Killed Girlfriend: गर्लफ्रेंडने उधार दिलेले पैसे मागितले.. बॉयफ्रेंडने हत्या करून पुरुनच टाकले - प्रियकराने प्रेयसीची हत्या करून मृतदेह पुरला

विवाहित असलेल्या गर्लफ्रेंडने तिच्या बॉयफ्रेंडला पैसे दिले होते. गर्लफ्रेंड सातत्याने तिचे उधारीचे पैसे परत मागत असल्याने रागावलेल्या बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडची हत्या केली. तिचा मृतदेह पुरुनही टाकला.

Spurned lover killed and dumped his girlfriend after she stopped talking to her in Vadodara Police exhumed her dead body
गर्लफ्रेंडने उधार दिलेले पैसे मागितले.. बॉयफ्रेंडने हत्या करून पुरुनच टाकले

By

Published : Jan 31, 2023, 7:55 PM IST

वडोदरा (गुजरात) : वडोदरा येथील पोर GIDCमध्ये आणखी एक हत्येची घटना समोर आली आहे. 10 दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या पोर जीआयडीसीमध्ये राहणाऱ्या परिणीताची तिच्याच प्रियकराने निर्घृण हत्या केल्याची माहिती आता पोलिसांच्या तपासातून पुढे आली आहे. प्रेयसीची हत्या करून प्रियकराने पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह पुरल्याचेही आता उघड झाले आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

१० वर्षांपासून होते प्रेमसंबंध :वडोदरा येथील पोर GIDC मध्ये राहणाऱ्या मित्तल राजूभाई बावलिया (35) या 22 जानेवारीच्या संध्याकाळी बेपत्ता झाल्या होत्या. त्यामुळे अखेर मित्तल यांच्या पतीने शोधाशोध केल्यानंतर वारणा पोलिस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी तपास केला. तपासादरम्यान पोर जीआयडीसी येथील कंपनीत काम करणाऱ्या पतीसोबत कंपनी क्वार्टरमध्ये राहणाऱ्या मित्तलचे १० वर्षांपूर्वी जवळच्या कंपनीत काम करणाऱ्या इस्माईल नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी इस्माईलकडे याबाबत चौकशी केली. चौकशीदरम्यान पोलिसांना इस्माईलवर संशय आला. त्यानंतर चौकशीत त्याने मित्तलची हत्या केल्याची कबुली दिली.

खोदल्यावर सापडला मृतदेह :इस्माईलने पोलिसांना सांगितले की, त्याने 22 जानेवारीला संध्याकाळी मित्तलला फोन केला होता. तेथून तिला दुचाकीवरून जीआयडीसीजवळील मोकळ्या मैदानात नेण्यात आले. तेथे तिची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह उसाच्या शेतात पुरण्यात आला. मित्तल त्याच्याकडून पैसे परत मिळवण्यासाठी वारंवार फोन करत असल्याने त्याने हत्या केली, अशी कबुली त्याने दिली. त्याने तिचा मोबाईल नंबर ब्लॉक केला होता. त्यानंतर पोलिसांनी इस्माईलला सोबत नेले, जेथे मित्तलचा मृतदेह पुरला होता, तेथे उत्खनन करण्यात आले. जिथे खूप खोल खोदल्यानंतर मित्तलचा मृतदेह सापडला. त्यामुळे पोलिसांनी इस्माईलला ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई केली आहे.

दोघांनाही आहेत दोन दोन मुले :मित्तल यांना १३ आणि १० वर्षांची दोन मुले आहेत. इस्माईल देखील विवाहित आहे, त्याला 16 वर्षांची मुलगी आणि 12 वर्षांचा मुलगा आहे. कंपनी सोडल्यानंतर इस्माईल हा करजन तालुक्यातील एका फार्मा कंपनीत कामाला होता. तिच्या पतीलाही इस्माईल आणि मित्तलच्या नात्याची माहिती होती. मात्र, इस्माईल अजूनही मित्तलच्या घरी सतत येत असे. विशेष म्हणजे प्रेमप्रकरणादरम्यान मित्तलने प्रियकर इस्माईलला अडीच लाखांची रक्कम दिली होती. जी मित्तलला परत घ्यायची होती. त्यासाठी इस्माईलने मित्तलला पैसे परत करण्याचे आश्वासनही दिले.

हेही वाचा: Soldier Cut father Private Part सैनिक मुलाने रागाच्या भरात वडिलांचे लिंगच छाटले बोटेही कापली गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details