महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / crime

Son Kills Father's Beloved In Chandrapur : वडिलांशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या महिलेची मुलाने केली हत्या - रामनगर पोलीस

वडिलांची प्रेयसी शौचास गेली असता मुलाने त्याच्या अल्पवयीन भावाच्या मदतीने तिच्या मानेवर चाकूने सपासप वार करून तिची हत्या केली (Son Kills Father's Beloved In Chandrapur). 'आमचे कुटुंब तुझ्यामुळे विस्कळीत झाले', असे म्हणत त्या २० वर्षीय मुलाने महिलेवर वार केले. पोलिसांच्या तपासातून हा प्रकार उघडकीस आला.

मुलाने केली हत्या
मुलाने केली हत्या

By

Published : Dec 9, 2021, 11:24 AM IST

चंद्रपूर - रमाबाईनगर (Ramabainagar) येथील झटपट नदीच्या किनारी काल एका ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला होता. धारदार शस्त्राने तिची हत्या केल्याचे समोर आले होते. मात्र, हा खून कोणी केला याचा तपास पोलीस करत होते. अखेर याचा उलगडा झाला असून, या महिलेचे ज्या पुरुषाशी अनैतिक संबंध (Immoral relationship with a man) होते त्याच्या मुलाने अल्पवयीन चुलत भावाची मदत घेत महिलेची हत्या केली आहे.

रमाबाईनगर परिसरात राहणारे कंत्राटदार मनीष (नाव बदललेले) यांच्यासोबत मागील पाच वर्षांपासून त्या महिलेचे संबंध होते. सदरील महिलेचा पती अवैध संबंधाला कंटाळून आपल्या गावी मुलाबाळांना घेऊन निघून गेला असल्याने ती महिला एकटीच राहत होती. मनीष व ती महिला आधी लपून- छपून भेटायचे. मात्र महिलेच्या पतीने तिला सोडल्यावर मनीष तिला राजरोसपणे भेटायला लागला. मनीषने तिला दुसऱ्या पत्नीचा दर्जा दिला होता.

महिलेचा केला पाठलाग

वडिलांचे असलेले हे अनैतिक संबंध हे त्यांच्या मुलांना मान्य नव्हते. त्यामुळे नेहमीच घरी भांडणं व्हायचे. याचा राग २० वर्षीय मुलगा अमित (नाव बदललेले) यांच्या मनात खदखदत होता. हे कुटुंब मुळचं बिहार राज्यातील. मनीष यांच्या आईचे निधन झाल्याने बिहारवरून त्यांचे नातेवाईक देखील इथे आले होते. यात अमितचा १४ वर्षीय चुलत भाऊ देखील होता. महिलेचा काटा काढून आपल्या कुटुंबाला होणार त्रास कायमचा कमी करू, अशी भावना त्यांची होती. ८ डिसेंबरला सकाळी ६ वाजता शौचास गेलेल्या त्या महिलेचा पाठलाग दोघा भावंडांनी केला.

मानेवर व पाठीवर सपासप वार

वाटेत तिला गाठत, 'आमचे कुटुंब तुझ्यामुळे विस्कळीत झाले', असे म्हणत चाकूने त्या महिलेच्या मानेवर व पाठीवर सपासप वार केले. ती महिला मरण पावली असल्याचे समजताच दोघांनी तिथून पळ काढला. रामनगर पोलिसांच्या सखोल तपासाने २४ तासांच्या आत आरोपींना अटक करण्यात आली. पुढील तपास रामनगर पोलीस (Ramnagar Police Station) करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details