महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / crime

Crime in Ahmednagar : गंमती गंमतीत बंदूक दाखवत असताना सुटली गोळी; भावजयीचा जागीच मृत्यू - Accused Vishal Bhalerao

अहमदनगर जिल्ह्यातील पोहेगाव ( Pohegaon in Ahmednagar ) येथे भावजयीला गंमती गंमतीत बंदूक दाखवत असताना, बंदकीतून गोळी सुटून भावजयीचा जागीच मृत्यू ( Brothers Wife Died on The Spot ) झाला. ही धक्कादायक घटना ( Shocking incident ) घडल्यानंतर आरोपी पसार झाले असून, एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. दोन आरोपी अजून फरार आहेत. आरोपी विशाल भालेराव ( Accused Vishal Bhalerao ) मयत सुनीता भालेराव ( Died Sunita Bhalerao ) यांना दाखवायला बंदूक आणली, थट्टा मस्करीत ट्रीगर दाबला गेल्याने सदर घटना घडली.

Died Sunita Bhalerao
मृत महिला सुनीता भालेराव

By

Published : Jul 8, 2022, 8:28 AM IST

शिर्डी (अहमदनगर) : अहमदनगर जिल्ह्यातील पोहेगाव ( Pohegaon in Ahmednagar ) येथे एक धक्कादायक घटना ( Shocking incident ) घडल्याचे समोर आले आहे. भावजयीला गंमती गंमतीत बंदूक दाखवत असताना दिराकडून भावजयीला गोळी ( Brothers Wife Died on The Spot ) लागली आहे. भावजय सुनीता भालेराव ( Died Sunita Bhalerao ) गोळीबारात मयत झाल्या आहेत. घटनेनंतर आरोपी विशाल भालेराव ( Accused Vishal Bhalerao ) घटनास्थळाहून फरार झाला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्यास अटक केली आहे. तर त्याच्यासोबतचे दोन मित्र अद्यापि फरार असून, त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.



घटना अशी घडली : कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील मयत सुनिता भालेराव यांचा मुलगा कल्पेश भालेराव याने याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे. आई सुनीता भालेराव गुरुवार दिनांक 7 जुलै रोजी सकाळी केसांना कोरफड लावत होती. याच दरम्यान फिर्यादीचा चुलता आणि त्याचे दोन मित्र घरात आले. आईला म्हटले की, वहिनी बघ मी बंदूक आणली. याच वेळी आरोपी सिद्धार्थ याला चुलते विशाल यांनी विचारले की, बंदूक कशी चालते? सिद्धार्थनेदेखील बंदूक हातात घेत खटका मागे ओढून पुन्हा विशालच्या हातात दिली.

घरातील इतर मंडळींनी केला होता विरोध : बंदूक दाखवत असताना काही गडबड होऊ नये म्हणून घरातील व्यक्तींनी विरोध केला. मात्र, चुलते विशाल यांनी फक्त वहिनीला दाखवण्यास आणल्याचे सांगितले, अशी माहिती मृतक महिलेच्या मुलाने पोलिसांना दिली असल्याची माहिती शिर्डी पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव यांनी दिली आहे.


अचानक दाबला गेला ट्रीगर : थट्टा-मस्करीत बंदूक हाताळणे सुरू होते. याच दरम्यान चुलते विशाल यांच्याकडून ट्रिगर दाबला गेला आणि आईच्या डोक्यात गोळी लागली. यावेळी आई सुनीता भालेराव रक्ताच्या थोराळ्यात पडल्या. तर आरोपी विशाल भालेराव, सिद्धार्थ कदम आणि अमोल भालेराव हे तिघेही बंदूक आणि गोळ्या घेऊन फरार झाले, असे कल्पेश भालेरावने पोलिसांना सांगितलं. दीर विशाल भालेराव याच्याकडून डोक्यात गोळी लागलेल्या सुनीता भालेराव यांना उपचारासाठी दाखल असता, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पोलिसांकडून तत्काळ कारवाई : फरार आरोपी विशाल भालेराव याला पोलिसांनी अटक केली असून, आणखी दोघे आरोपी फरार आहेत. संबंधित घटना घडल्यानंतर भालेराव कुटुंबीयांना पोलिसांनी तपासासाठी शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले. दरम्यान, फरार आरोपी विशाल याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी विनापरवाना शस्त्र वापरणे त्याचबरोबर इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. भादंवि 304, 201, 34, 3, 27 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तसेच, फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे.


हेही वाचा :Jalna Fraud Case : दोन मुलींच्या आईने दोन लाखांसाठी केलं दुसरं लग्न; पळ काढताच पोलिसांनी ठोकल्या बेड्या

हेही वाचा :Solapur Honeytrap Case : सोलापूरच्या बड्या नेत्याला हनीट्रॅपच्या माध्यमातून 2 कोटींची मागणी; मुंबईत गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details