महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / crime

Student Murdered After Sexual Assault : नागपुरात दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचारानंतर हत्या

नागपूर जिल्ह्यातील मौदा येथे ( At Mouda in Nagpur District ) इयत्ता दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर ( After Sexual Assault ) तिची निर्घृण हत्या ( Brutal Murder ) झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी मौदा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. धीरज सुरेश शेंडे असे आरोपीचे ( Dheeraj Suresh Shende Accused ) नाव आहे.

Nagpur Mouda Police Station
नागपूर मौदा पोलीस स्टेशन

By

Published : Jun 23, 2022, 2:14 PM IST

Updated : Jun 23, 2022, 3:02 PM IST

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील मौदा येथे इयत्ता दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिची निर्घृण हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी मौदा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. धीरज सुरेश शेंडे असे आरोपीचे नाव आहे.

नागपूर मौदा पोलीस स्टेशन

आरोपीने केली बळजबरी : या प्रकरणातील अल्पवयीन विद्यार्थिनी ही १५ वर्षांची आहे. ती शिकवणी वर्ग झाल्यानंतर आटोपून घरी परत जात असताना आरोपी धीरज शेंडे याने तिला बळजबरीने त्याच्या मोटरसायकलवर बसवले. त्यानंतर आरोपीने तिला कुही शिवारातील साळवा जंगलात नेले. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिची निर्घृण हत्या केली आहे. ही घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. त्यानंतर मौदा पोलिसांनी तपास सुरू केला असता यामध्ये मौदा येथील भामेवाडा येथील धीरज सुरेश शेंडे नामक आरोपीचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

इन्स्टाग्रामवर झाली ओळख :या प्रकरणातील आरोपी धीरजसोबत मुलीची ओळख ही इन्स्टाग्रामवर झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली होती. मात्र, ती मुलगी दुसऱ्या मुलाच्या संपर्कात असल्याची माहिती समजल्याने संतापलेल्या आरोपीने तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केली असल्याचे आता उघड झाले आहे

प्रेमसंबंधातून हत्या : सावळा जंगलात अल्पवयीन मुलीचा रक्ताच्या थारोळ्यातला मृतदेह आढळून आल्यानंतर मौदा पोलिसांनी तपास पोलिसांनी सुरू केला आहे. आरोपीने दिलेली माहिती आणि प्राथमिक तपासात ही घटना प्रेम प्रकरणातून घडली असल्याचा स्पष्ट झालं आहे. त्या आधारे पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :धक्कादायक..!भावानेच केला मानसिक दिव्यांग बहिणीचा अत्याचार करून खून

Last Updated : Jun 23, 2022, 3:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details