महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / crime

Sangli Shocking News : पत्नी नांदायला येत नाही, म्हणून दारुडा पती थेट विजेच्या टॉवरवर चढला - सांगली पोलीस

Sangli Shocking News : सांगलीतून एक धक्कादायक बातमी येत आहे. पत्नी घरी नांदायला येत नाही म्हणून पती विजेच्या टॉवर वर चढून बसला. वेळीच पोलिसांनी येऊन त्याला समजावून खाली उतरवले.

Sangli Shocking
Sangli Shocking

By

Published : Jul 21, 2022, 1:37 PM IST

सांगली - पत्नी नांदायला येत नसल्याच्या नैराश्यातुन एका दारुड्याने तासगावच्या नागरिकांसह प्रशासनाचा जीव टांगणीला लावला होता. दारू ढोसून थेट विजेच्या खांबावर चढून सुमारे तासभर विजेच्या तारांवर सर्कस करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ( Sangli Shocking News ) त्यानंतर त्याला खाली उतरवताना पोलीस आणि नागरिकांच्या नाकी नऊ आले होते. ( Sangli Police ) अखेर अथक प्रयत्नानंतर मद्यपी तरुणास खाली उतरवले आहे.

Sangli Shocking

विजेच्या खांबावर मद्यपी तरुणाचा झिंगाट -तासगाव शहरातील विटा नाका येथे भर रस्त्यातील एका विजेच्या खांबावर मद्यपी तरुणाचा झिंगाट थरार पाहायला मिळाले आहे. प्रशांत माळी नामक तरुणाने पत्नी नांदायला येत नसल्याने थेट विजेच्या खांबावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. दारूच्या नशेत विजेच्या खांबावर चढू लागला. ( Sangli Shocking News ) काही नागरिकांना तात्काळ याची माहिती वीज वितरण विभागाला देताच याठिकाणी असणारा विजेचा पुरवठा खंडित करण्यात आला होता.

पुरवठा बंद केल्याने मोठी दुर्घटना टळली -दरम्यान मदाधुंद अवस्थेत प्रशांत हा विजेच्या खांबावर पोहचला. सुदैवाने वीज पुरवठा बंद केल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र, विजेच्या खांबावर चढलेल्या प्रशांत याची कसरत सुरू झाली होती. ( Sangli Police ) सुमारे तासाभर प्रशांत हा सर्कस प्रमाणे विजेच्या खांबावर थरारक कसरत होता. दारुड्याचा हा प्रताप पाहण्यासाठी याठिकाणी नागरिकांची मोठी झुंबड उडाली होती.

प्रशासनाचे जीव टांगणीला-या प्रकारामुळे वाहतुकीचाही खोळंबा झाला होता.तर प्रशांत त्याची विजेचे खांबावर लटकून सूरु असलेला थरार पाहून नागरिकांच्या आणि प्रशासनाचे जीव मात्र टांगणीला लागला होते. अखेर एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर विजेच्या तारांना लटकणाऱ्या प्रशांतला खाली उतरवण्यात आलं आणि सगळ्यांनीच मग सुटकेचा श्वास सोडला. या प्रकरणी पोलिसांनी प्रशांत माळी याच्या विरोधात कारवाई केली आहे.

हेही वाचा -NCP departments cells dismissed : शरद पवारांकडून राष्ट्रवादीचे राष्ट्रीय पातळीवरील सर्व विभाग, सेल तातडीने बरखास्त

ABOUT THE AUTHOR

...view details