नागपूर :मिरची व्यापाऱ्याच्या ( Chilli Trader ) कर्मचाऱ्याला ( Employee of a Chilli Trader ) लुटून त्याच्याजवळील 20 लाख रुपयांची रोकड पळवल्याची ( Robbery of 20 Lakh ) घटना नागपुरातील यशोधरानगर पोलीस स्टेशनअंतर्गत चिखली फ्लायओव्हरवर येथे घडली आहे. सिद्धार्थ रामटेके ( Staff Siddharth Ramteke ) हे मिरची व्यापाऱ्याचे कर्मचारी आहेत. ते कळमना बाजार पेठेतील एका व्यापाऱ्यांकडून वीस लाख रुपयांची रोकड घेऊन आपल्या मालकाच्या घरी जात असताना चिखली उड्डाणपुलावर त्यांना लुटण्यात आले.
अशी घडली घटना : सिद्धार्थ हे पाऊस येत असल्यामुळे रेनकोट घालण्यासाठी थांबले होते. त्याच वेळेस पाठीमागून आलेल्या दोन लुटारूंनी सिद्धार्थला मारहाण करीत त्यांच्याकडील वीस लाख रुपयांची रोकड पळविली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनेचा पुढील तपास करीत आहेत.