मुंबई-मुंबईत महिला असुरक्षित आहे, असे नेहमीच बोलले जाते. त्याकरिता राज्य सरकारकडून महिलांच्या संरक्षणासाठी निर्भया पथकसारखे उपक्रम देखील महिलांच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आले आहेत. तरी मात्र मुंबईतील महिला असुरक्षित आहे. त्यासाठी राज्य सरकार कठोर कायदा करत असले तरी महिलांवरील अत्याचाराचे वाढते प्रमाण कसे रोखणार? हा प्रश्न देखील कायम ( Rape Cases In Mumbai ) आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी देखील मुंबईमधील महिलांवरील गुन्ह्यात वाढ झाली ( Rape Rate In Mumbai Increased ) आहे.
पोलिसांचाच अहवाल :मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 2020 च्या आकडेवारीनुसार महिलांवरील गुन्ह्याची संख्या 4 हजार 100 होती. 2021 मध्ये हे प्रमाण 5 हजार 496 इतके झाले. मागील वर्षी बलात्काराच्या 890 गुन्ह्यांची नोंद होती. तर त्यापूर्वीच्या वर्षी ही संख्या 693 एवढी होती. तर 2021 मध्ये ही संख्या 1396 एवढी आहे. पोलिस विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मागील वर्षी या गुन्ह्यांमध्ये वाढ झली आहे. तर राष्ट्रीय गुन्हे नोंदणीनुसार ( National Crime Register ) महाराष्ट्र देशात महिलासंबंधित गुन्ह्यात पाचव्या स्थानावर आहे.
कायद्यांचा प्रभावी वापर व्हावा : राज्य सरकारने नुकतेच 14 विशेष न्यायालये सुरू करण्याचे जाहीर केले आहे. यामध्ये न्यायाधीश आणि अन्य पदेही भरण्यात येणार आहेत. आता मुंबई, नाशिक, भंडारा, चंद्रपूर, धुळे, जालना, लातूर, नांदेड, धाराशीव, परभणी, सांगली, सातारा, सोलापूर व वर्धा याठिकाणी शहर दिवाणी सत्र न्यायालय व विशेष न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय विधी व न्याय विभागाने घेतला आहे. मात्र याचबरोबर तपास यंत्रणा, कठोर कायदे यांचा अधिक प्रभावी वापर हवा असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
गुन्ह्यांचा आढावा
प्रकार - 2020 2021 वाढ (टक्के)
एकूण गुन्हे 4100 5496 25.40
बलात्कार 693 890 23
अल्पवयीन