पुणे : पुण्यातील रविवार पेठ येथील एका सराफी दुकानात सोने खरेदीसाठी आलेल्या एका सराईत महिलेने सोने खरेदी केले. पण, पैसे देण्याच्या वेळी जाऊन गाडीत ठेवलेले पैसे आणून देण्याचा बहाण्याने पाच किलाे साेन्याची बिस्किटे ( Five Kg Gold Biscuits Theft ) घेऊन ती महिला गायब ( Jewel Shop Theft Pune ) झाली. २ काेटी साठ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी ( Faraskhana Police Station ) बारा तासांच्या आत त्या महिलेला खारघर येथून बेड्या ठोकत ऐवज जप्त केला आहे.
आरोपी महिलेविरोधात फरासखाना पोलिसांत तक्रार : माधवी सूरज चव्हाण (32, रा. खारघर) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोपटलाल गोल्डचे राकेश सोलंकी यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद ( Professional Fraud ) दिली आहे. संशयित आरोपी महिला ही मूळची खारघरची असून, ती तिचे पती सूरज चव्हाण यांच्याबरोबर राहते. तर तिचे माहेर पुण्यातच असून, तिची बहीणदेखील पुण्यातच राहण्यास आहे. पुण्यातून सोने घेऊन ते पुढे जास्त किमतीला देण्याचे काम ती करीत होती. विशेष म्हणजे ती सध्या गर्भवती आहे.
आरोपी महिला नेहमी अर्धा किलो सोने खरेदी करीत असे : बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास माधवी ही रविवार पेठेतील पोपटलाल गोल्डच्या दुकानात आली. नेहमी किलो, अर्धा किलो अशा वजनाचे सोने ती खरेदी करीत असे. बुधवारी तिने प्रेगनंट असल्याचे आणि वारंवार येण्यास जमणार नसल्याचे कारण देत तब्बल 5 किलो सोन्याची बिस्कीटे खरेदी केली. तिने काही रक्कम कॅश आणि काही रक्कम आरटीजीएस करणार असल्याचे सांगितले. सोन्याची बिस्कीटे खरेदी केल्यानंतर गाडीत ठेवण्यात आलेली कॅश घेऊन येण्याच्या बहाण्याने ती दुकानाच्या बाहेर पडली. दुकानदारानेदेखील तिच्या मागे एक व्यक्ती पाठविला. परंतु, तिथे तिने कर्मचार्याला हुलकावणी देऊन गायब झाली.
सराफाला हुलकावणी देऊन घर गाठले : सोन्याची बिस्कीटे घेऊन बाहेर पडल्यानंतर तिने एक रिक्षा करून वाकड गाठले. तेथून शेअर कारने ती खारघर येथे गेली. तिचे घर मूळ स्थानकापासून लांब असल्याने तेथूनही तिने रिक्षाने प्रवास केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तिला सकाळी पावणे नऊ वाजता ताब्यात घेऊन अटक करून न्यायालयात हजर केले. तिला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा :First Transgender Corporator In Kolhapur: राज्यात प्रथमच! हुपरी नगरपरिषदेत तृतीयपंथी स्वीकृत नगरसेवक