सूरत -सहा वर्षाच्या अगोदर चिमुकल्याचे अपहरण करत चोरी केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी दाम्पत्याला अटक केली आहे. मात्र या प्रकरणात चोरी झालेल्या बालकाने त्याच्या खऱ्या आई वडिलांकडे जाण्यास नकार दिल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना सूरतजवळील कामरेज तालुक्यात उघडकीस आली आहे. कमलेश चंदूभाई ओड असे त्या चिमुकल्याची चोरी करणाऱ्या आरोपीच तर नैना असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. या दोघांनी मुलबाळ होत नसल्याने त्यांनी चिमुकल्याची शिशू केंद्रातून चोरी केली होती.
शिशू केंद्रातून झाली चोरी :सूफिया मोहम्मद अली अंसारी यांच्या चिमुकल्याचे शिशू केंद्रातून चोरी झाली होते. त्यांनी संतान सुखापासून वंचित असलेल्या दाम्पत्याने या चिमुकल्याची चोरी केली होती. आरोपी कमलेशच्या पत्नीचा तीन वेळा गर्भपात झाला होता. त्यामुळे कमलेश निराश होता. तो रुग्णवाहिकेवर ईएमटीच्या पदावर कार्यरत होता. बाळ हवे असल्याने त्याने शिशू केंद्रातून तपासण्याच्या बहाण्याने चिमुकल्याची चोरी केली होती.
टीका देण्याचा बहाणा:आरोपी कमलेश आणि नैनाने 5 जानेवारी 2017 ला शिशू केंद्राच्या वार्डमध्ये शिरत बाळाला टीका देण्याचा बहाणा केला. त्यानंतर स्वाथ्य केंद्राच्या वार्डमधूनच त्यांनी चिमुकल्याचे अपहरण केले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या बाळाच्या पालकांनी 5 जानेवारी 2017 ला कामराज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी देवेंद्रसिंह किशोरदान व नामदेव कालाभाई हे करत होते. यावेळी त्यांना कठोल गावातून 2017 ला चोरलेल्या चिमुकल्याचा सुगावा लागला. एका रुग्णवाहिकेवर कार्यरत आरोपीने त्याची चोरी केल्याची माहिती खबऱ्याने त्यांना दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक बी भटोल, उपनिरीक्षक वी आर थुम्मर यांचे पथक करजनला पोहोचली.