मुंबई :रस्त्यावर संगीत वाजवणाऱ्या दिल्लीतील एका २५ वर्षीय व्यक्तीवर हल्ला करून खून करण्यात आला. वर्सोवा येथे रविवारी अंधेरी येथील सेव्हन बंगला येथील बस डेपोमध्ये ( Seven Bungalow in Andheri ) अज्ञात व्यक्तीचा खून करण्यात आला आहे. अज्ञात व्यक्ती मृतावस्थेत आढळल्यानंतर वर्सोवा पोलिसांनी ( Versova police ) हत्येच्या प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्हीच्या ( CCTV Cheking ) माध्यमातून आरोपीचा शोध अंधेरी पोलिसांकडून सुरू ( Andheri Police are Searching ) आहे.
Mumbai Crime News : वर्सोव्यात बस डेपोमध्ये एका व्यक्तीची पेव्हर ब्लॉकने ठेचून हत्या - Person was Crushed to Death
रविवारी अंधेरी येथील सेव्हन बंगला ( Versova police ) येथे दिल्लीतील एका 25 वर्षीय व्यक्तीवर पेव्हर ब्लाॅकने हल्ला करून खून करण्यात आला आहे. सेव्हन बंगला ( Seven Bungalow in Andheri ) येथील बस डेपोमध्ये ही व्यक्ती मृतावस्थेत आढळल्यानंतर पोलिसांनी हत्येच्या प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून ( CCTV Cheking ) आरोपीचा शोध अंधेरी पोलिसांकडून सुरू ( Andheri Police are Searching )आहे.
खून झालेल्या तरुणाची ओळख पटवण्यात आली : सूरज तिवारी (25) ( Deceased Suraj Tiwari ) असे पीडित तरुणाचे नाव आहे. पेव्हर ब्लॉकने मारल्याने त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस झालेल्या दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाला. ही घटना सकाळी 10.45 च्या सुमारास निदर्शनास आली. जेव्हा पोलिस नियंत्रण कक्षाने वर्सोवा पोलिसांना बस डेपोमध्ये डोक्याला अनेक जखमांसह अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाल्याची सूचना दिली.
मृतदेहावर अनेक जखमा असल्याचे तपासात निष्पन्न : रविवारी सकाळी सूरज तिवारी यांचा मृतदेह रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीला दिसला आणि पोलिसांना कळवण्यात आले. मृत व्यक्तीच्या शरीरावर डोक्याला अनेक जखमा आढळून आल्याचे पोलिसांना तपासात आढळले. तिवारी हा दिल्लीतील पालम भागातील असून, तो संगीतकार असल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. आरोपीची ओळख पटवण्यासाठी फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाची वर्सोवा पोलीस तपासात मदत घेत आहे.
हेही वाचा :Industrialist Avinash Bhosle : डीएचएफएल आणि येस बँक प्रकरणी उद्योगपती अविनाश भोसले यांच्या विरोधात सीबीआयकडून आरोपपत्र दाखल