पेण (रायगड) -पोलीस असल्याचा गैरफायदा घेत पती व मुलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. विवाहित महिलेशी मागील सहा वर्षांपासून शारीरिक संबंध ठेवणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल शाम जाधव याच्याविरोधात पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ( pen policeman rape married woman ) करण्यात आला आहे. पेण पोलिसांनी आरोपी शाम जाधव याला अटक केली व त्यास न्यायालयात हजर केले असता, त्याला 4 जानेवारी आजपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आरोपीला चार जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी -
अलिबाग येथील मुख्यालयात कार्यरत असलेला पोलीस कॉन्स्टेबल शाम जाधव (रा. शिवाजी नगर, रामवाडी, पेण) याने पोलीस असल्याचा फायदा घेत पेण शहरातील एका विवाहित महिलेला तिच्या पतीला व मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन 2015 पासून आजपर्यंत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले असल्याची तक्रार या महिलेने पेण पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री दाखल केली आहे. त्यानुसार पेण पोलीस ठाण्यात आरोपी पोलीस शाम जाधव याच्या विरोधात भा.द.वि. कलम 376 (1), 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपी शाम जाधव याला पेण पोलिसांनी अटक केली असून त्यास न्यायालयात हजर केले असता त्यास चार जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.