सातारा - पाटण तालुक्यातील ( Patan Taluka ) महाविद्यालयीन तरूणीच्या हत्येचा साडेतीन वर्षांनी उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तरूणीच्या आजीसह आणखी काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
महाविद्यालयातून घरी येताना झाला होता खून -करपेवाडी ( Karpewadi crime ) गावातील भाग्यश्री माने ही 22 जानेवारी 2019 रोजी सकाळी कॉलेजला गेली होती. मात्र, दुपारी करपेवाडी गावालगतच्या शिवारात गळा चिरलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेचा ढेबेवाडी पोलिसांनी सर्व बाजुंनी तपास केला होता. पोलिसांना देखील प्रारंभी कुटुंबातीलच लोकांवर संशय होता. मात्र, नेमके संशयित आणि हत्येमागील कारण स्पष्ट होत नव्हते. गेली साडे तीन वर्षे पोलीस गोपनीयरित्या तपास करत होते. अखेर पोलिसांच्या तपासाला यश आले आणि तरूणीच्या हत्येचा छडा लागला आहे.