हमीरपूर उत्तरप्रदेश,जिल्ह्यात बुधवारी एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यामुळे पोलिसांची झोप उडाली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका विद्यार्थिनीला विवस्त्र करून सहा तरुणांनी क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या girl beaten up naked आहेत. व्हायरल झालेला व्हिडिओ हमीरपूर सदर कोतवाली परिसरातील सिटी फॉरेस्टचा आहे. याप्रकरणी पोलिसांनी 3 तरुणांना ताब्यात घेतले आहे. nirbhaya like scandal in hamirpur
व्हायरल व्हिडिओ हा व्हिडिओ सिटी फॉरेस्ट भागातील आहे. येथे सहा युवक ज्यांच्या हातात बेल्ट आणि काठ्या आहेत ते नग्न तरुणीला मारहाण करण्यात मग्न आहेत. त्यांनी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. व्हिडिओ पाहून असे दिसते की, हा सामूहिक बलात्कारासारखा जघन्य गुन्हा आहे. मात्र, हमीरपूरचे पोलीस अधीक्षक शुभम पटेल यांनी सामूहिक बलात्कारासारख्या घटनेचा इन्कार केला आहे. तीन तरुणांना ताब्यात घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.