महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / crime

Dawood Ibrahim Mumbai Blast Case दाऊद इब्राहीमचे 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाशी आहे कनेक्शन, एनआयएने जाहीर केले २५ लाखांचे बक्षीस

1993 साली मुंबईमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने (Underworld don Dawood Ibrahim) साखळी बॉम्बस्फोट (1993 Serial Bombings) घडवून आणला होता. यामध्ये 257 मुंबईकरांचे प्राण गेले होते तर 700 हून अधिक लोक जखमी झाले होते. त्यानंतर दाऊद इब्राहिमने यांनी या सर्व स्फोटांची जबाबदारी स्वीकारली होती. तेव्हापासून आजवर दाऊद भारतीय तपासयंत्रणांना हुलकावणी (Ignoring the Indian Investigative Agencies) देत आहे. आता, राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) दाऊद संदर्भातील माहिती देणाऱ्यांना 25 लाख रुपयांचे बक्षीस (25 Lakh Reward On Dawood) देण्याची घोषणा केली आहे.

daud ibrahim
दाऊद इब्राहिम

By

Published : Sep 1, 2022, 7:41 PM IST

मुंबई1993 साली मुंबईमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने (Underworld don Dawood Ibrahim) साखळी बॉम्बस्फोट (1993 Serial Bombings) घडवून आणला होता. यामध्ये 257 मुंबईकरांचे प्राण गेले होते तर 700 हून अधिक लोक जखमी झाले होते. त्यानंतर दाऊद इब्राहिमने यांनी या सर्व स्फोटांची जबाबदारी स्वीकारली होती. तेव्हापासून आजवर दाऊद भारतीय तपासयंत्रणांना हुलकावणी (Ignoring the Indian Investigative Agencies) देत आहे. आता, राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) दाऊद संदर्भातील माहिती देणाऱ्यांना 25 लाख रुपयांचे बक्षीस (25 Lakh Reward On Dawood) देण्याची घोषणा केली आहे.

1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण (1993 Mumbai serial blasts case) 1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा दाऊद मास्टरमाईंड असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर मुंबईमध्ये दंगली उसळल्या. यामध्ये अनेक मुसलमानांचा बळी गेला. या घटनेने व्यथित झालेल्या दाऊदने पाकिस्तानच्या आयएसआय ISI च्या मदतीने भारतामध्ये बॉम्ब आणि शस्त्रं तस्करी (Bomb and arms smuggling) करून आणली. मंतर 12 मार्च 1993 रोजी मुंबईत साखळी बॉम्बस्फोट (1993 Serial Bombings) घडवून आणले. स्फोटांची जबाबदारीही घेतली. 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात एकूण 129 आरोपी होते. पैकी 100 आरोपींना टाडा न्यायालयाने दोषी ठरवत त्यांना 6 महिने ते मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार याकूब मेमन (Yakub Memon) होता. याकुबला कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानुसार, त्याला फाशी देखील देण्यात आली. तर दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, अनीस इब्राहीम यांच्यासह अनेक आरोपी अजूनही फरार आहेत.

दाऊद कुठे आहे ? (Where is Dawood?) दाऊद इब्राहिमने आपलं बस्तान दुबईमधून नंतर पाकिस्तानात हलवलं आणि तिथे पाकिस्तानने त्याला आसरा दिल्याचा आरोप अनेकदा करण्यात आलाय. पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI चा पाठिंबा दाऊदला मिळत असून तो कराचीत राहत असल्याचा आरोप भारताने केला होता. पण दाऊद आणि त्याचं कुटुंब पाकिस्तानात नसल्याचं पाकिस्तानने अनेकदा म्हटलंय. पाकिस्तान सरकारने देशातल्या 88 कट्टरतावादी नेते आणि संघटनांवर 22 ऑगस्टला निर्बंध लादले. या यादीत दाऊद इब्राहिमचा समावेश करत पाकिस्तान सरकारने पहिल्यांदाच अप्रत्यक्षपणे का होईना दाऊद आपल्याच देशात असल्याचं स्वीकारलं.

हेही वाचा Underworld Don Dawood Ibrahim पोलिसाचा मुलगा कसा झाला अंडरवर्ल्ड डॉन वाचा सविस्तर

ABOUT THE AUTHOR

...view details