महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / crime

Nashik Crime News : दीड काेटींची फसवणूक करणारा सफाई कामगार अटकेत; बँक आँफ महाराष्ट्रसह खातेदारांना घातला गंडा, - Bhagwan Gyandev Aher

नाशिकमधील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ( Bank of Maharashtra in Nashik ) बॅंकेसह खातेधारकांची दीड कोटींची फसवणूक ( Cheated One And a Half Crores ) झाल्याचा प्रकार समोर आला आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमधील भऊर शाखेतील कर्मचारी ( Employee of Bhaur in Bank ) भगवान ज्ञानदेव आहेर ( Bhagwan Gyandev Aher ) रा. लोहणेर, ता. देवळा याने कामावर असताना पदाचा गैरवापर करीत खातेधारकांना फसवून त्यांच्याकडून दीड कोटी रुपयांची रक्कम लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बॅंकेच्या नावाच्या नावाचा सही-शिक्का असलेल्या हस्तलिखित पावत्या तयार करून खातेधारकांना दिल्या.

Accused Bhagwan Gnyandev Aher with police
रोपी भगवान ज्ञानदेव आहेर पोलिसांसमवेत

By

Published : Jul 15, 2022, 4:13 PM IST

नाशिक : नाशिक येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ( Bank of Maharashtra in Nashik ) एका कर्मचाऱ्याकडून दीड कोटींची फसवणूक ( Cheated One And a Half Crores ) केल्याचा प्रकार समोर आला आहे. बॅंकेतील भऊर शाखेतील कर्मचारी ( Employee of Bhaur in Bank ) भगवान ज्ञानदेव आहेर ( Bhagwan Gyandev Aher ) रा. लोहणेर, ता. देवळा असे संशयिताचे नाव आहे. ते बँक ऑफ महाराष्ट्र भऊर शाखेत सन २०१६ पासून रोजंदारीवर कार्यरत होते. कामावर असताना पदाचा गैरवापर करून बँक ठेवीदारांच्या, खातेधारकांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर खातेधारकांकडून पीककर्जाची रक्कम स्वीकारून खातेधारकांच्या खात्यात जमा केली.

बॅंकेतील सही-शिक्क्याचा दुरुपयोग : खातेदारांच्या बचत खात्याची रक्कम स्वीकारून बँक ऑफ महाराष्ट्र नावाचा सही-शिक्का असलेल्या हस्तलिखित पावत्या तयार केल्या. पेनाने लिहिलेल्या मुदत ठेवी पावत्या तयार करून त्या बँक ठेवीदारांना त्यांच्याकडून रक्कम स्वीकारून अदा केल्या. या रक्कमा बँकेत जमा न करता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरून १ काेटी ५० लाख ७३ हजार रुपयांच्या रकमेची फसवणूक करून अपहार केला. यासह मुदत ठेव पावती पुस्तकातील २७ पावत्या चोरी केल्या हाेत्या.

बँक ऑफ महाराष्ट्रमधील 32 खातेदारांना फसवले : २०१६ पासून बँक ऑफ महाराष्ट्र भऊर शाखेत रोजंदारीवर सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होता. त्याने बँकेतील जवळपास ३२ खातेदारांच्या खात्यावरील रक्कमा बँकेत जमा न करता स्वतःचे फायद्यासाठी सुमारे ०१ कोटी ५० लाख ७३ हजार रुपयेचा अपहार केल्याचे उघडकीस झालेले आहे. पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांचे मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे, सहायक निरीक्षक शिरसाठ, जमादार देवरे पुढील तपास करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details