मुंबई :मुंबई शहर हे महिलांसाठी सर्वात अधिक सुरक्षित समजले जाते. मात्र, त्याच मुंबईमध्ये महिला असुरक्षितअसल्याचे चित्र समोर आले आहे. मुंबई पोलिसांकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मुंबईमध्ये दिवसाला तीन महिलांवर लैंगिक अत्याचाराचे प्रकार घडत असल्याची बाब आकडेवारीनुसार समोर आली आहे. मुंबईमध्ये सहा महिन्यांत 494 महिलांवर बलात्कारझाल्याची घटना समोर आली आहे.
मुंबई पोलिसांकडून 6 महिन्यातील गुन्हेगारीसंदर्भात आकडेवारी जाहीर : मुंबई पोलिसांकडून गुन्हेगारीसंदर्भातील आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईमध्ये महिला असुरक्षितअसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मागील सहा महिन्यांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये जानेवारी ते जूनपर्यंत मुंबईत दररोज सरासरी 3 महिलांवर बलात्कार झाला आहे. सहा महिन्यांत महिलांवरील बलात्काराचे 494 गुन्हे दाखल झाले आहेत.
बलात्काराच्या घटनांमध्ये 84 टक्के गुन्ह्यांची उकल : बलात्काराच्या घटनांमध्ये तपासाचे प्रमाण पाहता काहीसा दिलासा मिळतो. जानेवारी ते जून या कालावधीत नोंदवलेल्या महिलांवरील बलात्काराच्या 84 टक्के गुन्ह्यांची उकल पोलिसांनी केल्याचे अहवालात म्हटले आहे. हे यश 2021 च्या तुलनेत 19 टक्क्यांनी जास्त आहे. कारण गेल्या वर्षी पोलिसांनी केवळ 78 टक्के प्रकरणांची उकल केली होती. मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या मासिक गुन्हे अहवालात ही बाब समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या अहवालानुसार गेल्या महिन्यांत म्हणजेच जून महिन्यात महिलांवर बलात्काराच्या 73 घटना नोंदवण्यात आल्या आहेत. मे महिन्यात हा आकडा 95 होता. ज्यामध्ये किरकोळ प्रकरणे 52 आणि मोठी प्रकरणे 43 आहेत.