मुंबई - विमानतळ कस्टम्सने दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये 31.29 कोटी रुपयांचे 4.47 किलो हेरॉईन आणि 15.96 कोटी रुपयांचे 1.596 किलो कोकेन जप्त केले आहे. हेरॉईन दस्तऐवजांच्या फोल्डर कव्हरमध्ये लपवले होते. तर कोकेन कापडाच्या बटणांमध्ये लपवले होते, असे सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबईत 31 कोटींचे अमली पदार्थ विमानतळावरुन जप्त - undefined
विमानतळ कस्टम्सने दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये 31.29 कोटी रुपयांचे 4.47 किलो हेरॉईन आणि 15.96 कोटी रुपयांचे 1.596 किलो कोकेन जप्त केले आहे. हेरॉईन दस्तऐवजांच्या फोल्डर कव्हरमध्ये लपवले होते. तर कोकेन कापडाच्या बटणांमध्ये लपवले होते.
मुंबईत 31 कोटींचे अमली पदार्थ विमानतळावरुन जप्त
अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपींवर एनडीपीएस कायद्याच्या कलम 8 आणि 21, कलम 23 आणि कलम 29 नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.एनडीपीएस कायद्याच्या कलम 43(अ) अंतर्गत लपविलेल्या साहित्यासह अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
Last Updated : Jan 6, 2023, 2:36 PM IST