अकोला - शहरातील न्यू तापडिया नगर येथील उड्डाणपुलाजवळ एका मेडिकल प्रतिनिधीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. रितेश रामदास डाहारे (रा. न्यु तापडिया नगर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
अकोल्यात मेडिकल प्रतिनिधीची गळफास घेवून आत्महत्या - अकोला लेटेस्ट न्यूज
उड्डाण पुलाजवळ एका लोखंडी पोलला गळफास लावून आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाइन पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला. यावेळी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठवला आहे.
शहरातील न्यु तापडिया नगर येथे राहणारा युवक रितेश रामदास डाहारे हा मेडिकल प्रतिनिधी म्हणून नोकरी करत होता. त्याने उड्डाण पुलाजवळ एका लोखंडी पोलला गळफास लावून आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाइन पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला. यावेळी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठवला आहे. मृतदेहाजवळ एक काळ्या रंगाची बॅग सापडली असून त्यामध्ये काही कागदपत्रे आढळून आली आहे. रितेश डाहारे याच्या आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्याच्या आत्महत्येला सावकाराची किनार असल्याची परिसरात चर्चा आहे. याबाबत अद्याप स्पष्ट होवू शकले नसले तरी नातेवाईकांनाही घटनास्थळी पोलिसांसमोर आरोप केल्याची माहिती आहे. यादृष्टीने सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे पोलीस अधिक तपास करीत आहे.
हेही वाचा - आमदार दिलीप मोहिते यांना 'हनी ट्रॅप'मध्ये आडकविण्याचा प्रयत्न, तिघांवर गुन्हा दाखल