रतलाम - नराधम पतीने आपल्या पत्नीसह दोन चिमुकल्यांचा खून करुन दारातच त्यांना पुरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तब्बल दोन महिन्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटल्याने हे मृतदेह बाहेर काढण्यात आले. ही घटना रतलाम शहराच्या विंध्यवासिनी आम्रपाली नगरात घडली. सोनू तलवाडे असे त्या नराधम पतीचे नाव असून त्याचे हे दुसरे लग्न होते. कौटुंबिक वादातून हा खुनाचा प्रकार घडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
रेल्वेत गँगमन आहे आरोपी :रतलाम शहरातील विंध्यवासिनी आम्रपाली नगरात आरोपी सोनूची पत्नी आपल्या आणि दोन चिमुकल्यांसह राहत होता. दोन महिन्यापूर्वी त्यांना आपल्या पत्नीसह दोन चिमुकल्याचा खून केल्याची घटना घडली होती. मात्र त्याने या प्रकरणी आपल्याला काहीच माहिती नसल्याचा पवित्रा घेतला होता. मात्र याप्रकरणी पोलिसांनी मिसींगच्या तक्रारीवरुन या प्रकरणाचा छडा लावला.
कौटुंबीक वादातून घडली घटना :नराधम सोनू तलवाडे हे रेल्वेत गँगमन म्हणून कार्यरत आहे. त्याने आपल्या दुसऱ्या पत्नीचा कौटुंबीक वादातून खून केला. आरोपी सोनूने अगोदर आपल्या दोन चिमुकल्याचा खून केल्यानंतर पत्नीला संपवल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर तीनही मृतदेह अंगणात पुरले. मात्र पत्नी आणि चिमुकले हरवल्याच्या प्रकरणात पोलिसांना सोनू तलवाडेवरच संशय होता. त्यामुळे पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यानंतरही सोनूने पोलिसांना उडवाउडवीची माहिती दिली. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच सोनूने आपणच पत्नीसह चिमुकल्याचा खून केल्याची माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले.