वृद्ध आईवर अत्याचार; पोलिसांनी नराधमाला केले गजाआड - Buldana rape news
आईवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या किशोर खंडारे नामक आरोपीला रायपूर पोलिसांनी रायपूर गावाजवळच्या एका हॉटेलमधून सोमवारी 7 जून रोजी संध्याकाळी अटक केली आहे.
बुलडाणा- तालुक्यातील पिंपळगाव सराई येथे आईवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या किशोर खंडारे नामक आरोपीला रायपूर पोलिसांनी रायपूर गावाजवळच्या एका हॉटेलमधून सोमवारी 7 जून रोजी संध्याकाळी अटक केली आहे. आरोपीला बुलडाणा न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपी होता फरार-
रायपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पिंपळगाव सराई येथे हमाली करणाऱ्या किशोर खंडारे नामक 45 वर्षीय आरोपीने पत्नी माहेरी गेली असल्याने आई एकटीच घरी असल्याचा फायदा घेत आपल्या 65 वर्षीय आईसोबत शनिवारी 5 जूनच्या रात्री अत्याचार केला होता. रविवारी 6 जून रोजी आईने रायपूर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली होती. यात पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून आरोपी मुलगा फरार होता.
रायपूर गावाजवळील एका हॉटेलमध्ये दडून बसलेला होता आरोपी-
पीडित आईच्या तक्रारीवरून आरोपी मुलगा किशोर खंडारे यांच्यावर रायपूर पोलीस ठाण्यात 6 जून रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यादिवशी पासून आरोपी किशोर फरार झाला होता. दरम्यान रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुभाष दुधाळ यांनी तपासचक्रे फिरवून आरोपीचा शोध लावला व एएसआई यशवंत तायडे व पोलीस कर्मचारी शेख कयूम यांनी पिंपळगाव सराई गावा जवळ एका हॉटेलमध्ये दडून बसलेल्या आरोपीला सोमवारी 7 जून रोजी अटक करून बुलडाणा न्यायालयात हजर केले. त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.