कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल येथे तिहेरी हत्याकांडाची ( Killing of Wife Due to Suspicion of Character ) घटना उघडकीस ( Triple Murder Come to Light at Kagal in Kolhapur ) आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीचे पत्नीसोबत भांडण झाल्याने त्याने तिच्यासह दोन्ही मुलांचा खून केला आहे. प्रकाश बाळासो माळी (वय 42) असे पतीचे नाव ( Killing of Wife Due to Suspicion of Character ) आहे. काल दुपारी 2 ते रात्री 8 वाजेपर्यंत त्यांने एका पाठोपाठ एक असे सगळे कुटुंबच संपवले आहे. कागल पोलिसांत याबाबत गुन्हा दाखल झाला ( Kolhapur Crime News ) आहे.
पत्नीचा खून करून मुलांना कोण सांभाळणार म्हणून त्यांचाही खून : मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश माळी हा येथील हमीदवाडा कारखान्यात कामाला होता. येथील काळम्मावाडी वसाहतजवळील तापी नावाच्या घरकुलमध्ये तळमजल्यावर तो राहायला होता. पत्नी आणि आपल्या दोन मुलांसोबत तो तिथे राहतो. तिचे पत्नी गायत्री माळी (वय 37) हिच्याशी नेहमीच वाद होत होता. कालसुद्धा कोणाशी फोनवर बोलतेस म्हणत दोघांमध्ये वाद झाला. वाद वाढत गेल्याने प्रकाशने पत्नीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तो तसाच मृतदेहासमोर बसला होता.
Kolhapur Triple Murder : तिहेरी हत्याकांडाने कोल्हापूर हादरले; चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीसह दोन्ही मुलांचा केला खून - Kolhapur Crime News
तिहेरी हत्याकांडाने कोल्हापूर हादरले. कोल्हापुरातील कागल येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्येनंतर ( Killing of Wife Due to Suspicion of Character ) निर्दयीपणे दोन मुलांची हत्या बापाने केल्याची घटना ( Triple Murder Come to Light at Kagal in Kolhapur ) उघडकीस आली आहे. काल दुपारी 2 ते रात्री 8 वाजेपर्यंत त्यांने एका पाठोपाठ एक असे सगळे कुटुंबच संपवले आहे. कागल पोलिसांत याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलाचा आणि मुलीचा केला निर्दयी खून : त्यानंतर सायंकाळी शाळेतून परत आलेल्या त्याच्या आठवीत शिकणाऱ्या पोलिओग्रस्त मुलाचासुद्धा त्याने गळा आवळून खून केला. मुलगी आदिती माळी (वय 17) अकरावीत शिक्षण घेते. तीसुद्धा रात्री 8 वाजण्याच्या सुमारास परत आल्यानंतर त्याने तिलाही ठार मारण्याचा प्रयत्न केला त्यातून आरडाओरडासुद्धा केला. मात्र, त्याने तिच्यासुद्धा डोक्यात वरवंटा घातला आणि नंतर गळा आवळून खून केला. संबंधित संशयित आरोपी प्रकाश माळीने स्वतः पोलिसांत जाऊन याबाबत खुनाची कबुली दिल्याची माहिती मिळाली आहे.