नागपूर:नागपूर शहरात (Nagpur City Crime) पुन्हा एकदा दिवसा-ढवळ्या हत्येची घटना घडली. रस्त्याच्या अगदी मधोमध एका व्यक्तीची धारधार शस्त्राने वार करून, हत्या (Nagpur city street murders) करण्यात आली. गिट्टीखदान पोलीस स्टेशन आणि गुन्हेशाखा कार्यालयाच्या काहीश्या अंतरावर ही घटना घडली. नारायण गयाप्रसाद द्विवेदी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आरोपींनी नारायण गयाप्रसाद द्विवेदी यांची हत्या केल्यानंतर, मृतदेहाचा मोबाईलवर फोटो (Criminal took a photo of the dead body) काढून तो मित्राला पाठवला. गिट्टीखदान पोलीसांनी (Gittikhadan police) या घटनेची नोंद केली आहे.
शहरातील गजबजलेल्या काटोल रस्त्यावर, सकाळी मृतक नारायण गयाप्रसाद द्विवेदी हे दुचाकीने ड्युटीवर जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. आरोपींनी नारायण द्विवेदी यांच्यावर चाकुचे अनेक वार केल्याने, ते दुचाकीसह रस्त्यावरचं कोसळले; त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी हे घटनास्थळा वरून पसार झाले. गिट्टीखदान पोलीसांनी या घटनेची नोंद केली आहे.